पुणे महानगरपालिकेकडून कनिष्ठ अभियंता ( JUNIOR CIVIL ENGINEER) पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 169 रिक्त जागा आहेत. ही एक उत्तम संधी आहे तंत्रशिक्षण घेतलेल्या व सरकारी नोकरी ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.
▪️भरती विभाग – पुणे महानगरपालिका
▪️भरती प्रकार – राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) च्या वतीने हे भरती राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 169 रिक्त पदे आहे.
▪️पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता ( JUNIOR CIVIL ENGINEER)
▪️गट – गट क
▪️वेतनश्रेणी – ₹38,600 – ₹,122,800 (S-14 वेतनश्रेणी)
▪️नोकरीचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
पदाचे तपशील
पदाचे नाव | कनिष्ट अभियंता ( JUNIOR CIVIL ENGINEER) |
गट | गट क |
वेतनश्रेणी | ₹38,600 – ₹,122,800 (S-14 वेतनश्रेणी) |
कर्तव्ये | महानगरपालिकेतील स्थापत्य विषयक कामे, सर्वेक्षण, प्रकल्प तयार करणे, बांधकामावर देखरेख व नियंत्रण, कामांचा दर्जा तपासणे इत्यादी. |
एकूण रिक्त जागा | 169 |
शैक्षणिक पात्रता
▪️कनिष्ठ अभियंता ( JUNIOR CIVIL ENGINEER) पदासाठी खालील दिलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
1] मान्यताप्राप्त महाविद्यालायतून किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (DEGREE IN CIVIL ENGINEERING).
किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालायतून किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (DIPLOMA IN CIVIL ENGINEERING).
वयोमर्यादा
किमान वय | कमाल वय |
---|---|
सामान्य प्रवर्ग (GENERAL) | 18 ते 38 वर्षे |
मागासवर्गीय प्रवर्ग (BACKWARD) | 18 ते 43 वर्षे |
दिव्यांग ( PWD) | 18 ते 45 वर्षे |
⚠️ टीप: अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय, खेळाडू व प्रकल्पग्रस्त सारख्या अन्य राखीव वर्गांसाठी वयात सवलत भारत सरकारच्या नियमांनुसार लागू असेल, ज्याची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देलेली आहे.
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू | 01 ऑक्टोबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 31 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) |
परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक | परीक्षेच्या 7 दिवसा आधी जाहीर करण्यात येईल |
महत्वाचे लिंक्स
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
अर्ज शुल्क
प्रवर्ग | शुल्क |
---|---|
सामान्य प्रवर्ग (GENERAL) | ₹1000 |
मागासवर्गीय | ₹900 |
माजी सैनिक | शुल्क नाही |
⚠️ परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जाणार. तसेच परीक्षा शुल्क ही परतावा (NON-REFUNDABLE) नसेल.
निवड प्रक्रिया
कनिष्ठ अभियंता ( JUNIOR CIVIL ENGINEER) पदासाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन कॉम्प्युटर-आधारित परीक्षेच्या (CBT) आधारे होणार आहे.
▪️ऑनलाईन अर्ज: उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज भरावा व शुल्क भरावे.
▪️प्रवेशपत्र डाउनलोड: परीक्षेच्या काही दिवस आधी प्रवेशपत्र (ADMIT CARD) अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागेल.
▪️ऑनलाईन परीक्षा (CBT):100 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटे.
▪️गुणवत्ता यादी: परीक्षेतील गुणांवरून गुणवत्ता यादी (MERIT LIST) तयार केली जाईल.
▪️कागदपत्र तपासणी: गुणवत्ता यादीत असलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची (शैक्षणिक दाखले, जात दाखला, निवास दाखला इ.) तपासणी केली जाईल.
▪️अंतिम नियुक्ती: कागदपत्र तपासणी यशस्वी झाल्यानंतर उमेदवाराला विभागात नियुक्ती देण्यात येईल.
परीक्षेचे स्वरूप
विषय | प्रश्न | गुण | वेळ |
---|---|---|---|
इंग्रजी | 15 | 30 | – |
मराठी | 15 | 30 | – |
सामान्य ज्ञान | 15 | 30 | – |
बौद्धिक चाचणी | 15 | 30 | – |
अभियांत्रिकी विषयासंबंधित (TECHNICAL QUESTIONS) | 40 | 80 | – |
100 | 200 | 120 मिनीट |
अर्ज प्रक्रिया
1] अधिकृत संकेतस्थळ: https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ या संकेतस्थळावर जा.
2] नवीन नोंदणी: “New Registration” वर क्लिक करा. आपले नाव, मोबाईल नंबर, ई-मेल ID टाइप करा. तात्पुरता नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड मिळेल.
3] लॉगिन करा: मिळालेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
4] अर्ज फॉर्म भरा: लॉगिन केल्यानंतर, अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता, अनुभव (असल्यास) इ. माहिती अचूक भरा.
5] फोटो व सही अपलोड करा: आकारानुसार (3.5 cm x 4.5 cm) तुमचा अलीकडील फोटो आणि काळ्या पेनने केलेली सही स्कॅन करून अपलोड करा.
6] अर्ज शुल्क भरा: आवश्यक अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
7] अर्ज सबमिट करा: शेवटी, अर्जाची छाननी करून ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर अर्जात बदल करता येणार नाही.
8] प्रिंटआउट घ्या: अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून ठेवा.
आवश्यक कागदपत्रे
▪️भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Recruitment)
1] अर्जदाराची माहिती ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटची प्रत
2] मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी/पदविका
3] जन्मतारखेचा पुरावा
4] आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) प्रमाणपत्र (लागल्यास)
5] आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र
6] वैध जात-पडताळणीचे प्रमाणपत्र
7 ] पाच वर्षे रहिवासी असल्याचा दाखला (Domicile Certificate)
8] विवाहित महिला उमेदवारांसाठी विवाह प्रमाणपत्र (लागल्यास)
9] सेवेत असलेल्यांसाठी अनुभवाचा दाखला/सेवा दाखला
10] राज्य शासनाने दिलेला अपंगत्वाचा दाखला (लागल्यास)
11] शिक्षणाची प्रमाणपत्रे – 10वी, 12वी, डिप्लोमा, पदवीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
12] शासनाने अपेक्षित MSCIT किंवा समतुल्य संगणक पात्रतेचे प्रमाणपत्र
13] इतर आवश्यक कागदपत्रे – अधिवास, विवाह, ओळखपत्र इ. (लागल्यास)
⚠️ कृपया भरतिवेळेस लागणारे कागदपत्रे अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद आहे.️
▪️कनिष्ठ अभियंता ( JUNIOR CIVIL ENGINEER) भरती 2025 : 169 पदांसाठी सुवर्णसंधी!
पुणे महानगरपालिकेकडून सिव्हील अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी सिव्हील अभियांत्रिकीमध्ये पदवी/पदविका असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा आणि कागदपत्र तपासणीवर आधारित असेल. पदासाठी ३८,६०० ते १,२२,८०० रुपये दरमहा वेतनश्रेणी निर्धारित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन मोडमध्ये पार पडेल. अधिक माहितीासाठी pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1] कनिष्ठ अभियंता पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा पदविका आवश्यक आहे.
2] वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे आहे. आरक्षित वर्गासाठी शासन नियमानुसार सवलत लागू होते.
3] परीक्षेचे स्वरूप काय आहे?
उत्तर: ऑनलाईन कॉम्प्युटर-आधारित परीक्षा (CBT) आहे. एकूण 100 प्रश्न, 200 गुण आणि 120 मिनिटांचा कालावधी असेल. इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी व अभियांत्रिकी विषयासंबंधित (TECHNICAL QUESTIONS) प्रश्न यांचा समावेश असेल.
4] अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: सामान्य वर्गासाठी ₹1,000/-, मागास वर्गासाठी ₹900/- आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क माफ आहे.
5] अर्ज कधीपर्यंत करता येतील?
उत्तर: अर्ज करण्यासाठी 1 October 2025 ते 31 October 2025 हा कालावधी आहे.
6] निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: ऑनलाईन परीक्षा + कागदपत्र तपासणी.
7] पगार किती असेल?
उत्तर: तनश्रेणी S-१४ नुसार ₹३८,६०० – ₹१,२२,८०० दरमहा
8] MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे का?
उत्तर: होय, नियुक्तीच्या २ वर्षांच्या आत MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र पूर्ण करणे अनिवार्य
9] अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा, घोषणापत्र, शैक्षणिक दाखले, जन्म दाखला, आधार कार्ड आणि आरक्षणासाठी संबंधित दाखले आवश्यक आहेत.
10] मदत केंद्राचे संपर्क काय आहेत?
उत्तर: हेल्पडेस्क साठी https://cgrs.ibps.in/ या संकेतस्थळावर भेट द्या किंवा 180022236 आणि 18001034566 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा.