सीएसआईआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे येथे तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या 34 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत येणारी ही प्रतिष्ठित संस्था युवा, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.
▪️भरती विभाग – सीएसआईआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला (CSIR-NCL), पुणे
▪️भरती प्रकार – ही भरती भारत सरकार (GOVERMENT OF INDIA) च्या अंतर्गत असलेलल्या संस्था मार्फत राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 34 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – पुणे
Table of Contents
Toggleपदाचे तपशील (Post Details)
A] तंत्रज्ञ (Technician-I) – 15 पदे
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग | 1 |
| संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स | 1 |
| फिटर | 2 |
| प्लंबर | 1 |
| रेफ्रिजरेशन आणि एसी तंत्रज्ञ | 1 |
| इलेक्ट्रिशियन / वायरमन | 2 |
| मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर) | 1 |
| ड्राफ्ट्समन (सिव्हिल) | 1 |
| अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) | 3 |
| इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिक | 1 |
| प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर | 1 |
| 15 |
B] तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) – 19 पदे
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| बौद्धिक संपदा व्यवस्थापन | 1 |
| संगणक अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान | 1 |
| ग्रंथपाल | 2 |
| संग्रहालय / अभिलेख व्यवस्थापन | 1 |
| सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट / डेटाबेस मॅनेजमेंट | 1 |
| हार्डवेअर आणि नेटवर्क मॅनेजमेंट | 1 |
| सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा मायनिंग | 1 |
| विज्ञान संप्रेषण / पत्रकारिता | 2 |
| ग्राफिक डिझाइनिंग | 1 |
| मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी | 2 |
| रसायनशास्त्र (विश्लेषणात्मक उपकरणे) | 3 |
| इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा | 1 |
| यांत्रिक अभियांत्रिकी डिप्लोमा | 1 |
| सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा | 1 |
| 19 |
शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)
A] तंत्रज्ञ (Technician-I) पदे
– SSC/10वी विज्ञान विषयांसह किमान 55% गुणांसह आणि ITI प्रमाणपत्र संबधीत ट्रेड मध्ये.
B] तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) पदे
– BSC व डिप्लोमा 60% गुणांसह उत्तीर्ण आणि संबधीत क्षेत्रात अनुभव.
⚠️ सूचना – विविध पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. कृपया खालील दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF वाचावी.
वेतनश्रेणी (PAY SCALE)
| पदाचे नाव | पे – लेवल | वेतन |
|---|---|---|
| तंत्रज्ञ (Technician-I) पदे | Level – 02 (7वा केंद्रीय वेतन आयोग) | ₹19,900 – ₹63,200 |
| तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) पदे | Level – 06 (7वा केंद्रीय वेतन आयोग) | ₹35,400 – ₹1,12,400 |
वयोमर्यादा (Age Limit)
▪️वयोमार्यादा गणण्याचा दिनांक – 12 जानेवारी 2026
| किमान वय | कमाल वय |
|---|---|
| 18 वर्षे | 28 वर्षे |
▪️वयोमर्यादा सवलत –
| वर्ग | वयोमर्यादा सवलत |
|---|---|
| अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) | 05 वर्षे |
| इतर मागास वर्ग (OBC-NCL) | 03 वर्षे |
| दिव्यांग (PwBD) – UR | 10 वर्षे |
| दिव्यांग (PwBD) – SC/ST | 15 वर्षे |
| भूतपूर्व सैनिक – UR | लागू सेवा कपात केल्यानंतर 03 वर्षे |
| भूतपूर्व सैनिक – OBC/SC/ST | लागू सेवा कपात केल्यानंतर 06/08 वर्षे |
| सरकारी कर्मचारी | 05 वर्षे |
| विधवा/घटस्फोटित महिला (UR/OBC) | 35 वर्षांपर्यंत |
| विधवा/घटस्फोटित महिला (SC/ST) | 40 वर्षांपर्यंत |
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 डिसेंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 जानेवारी 2026 |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
| अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया (Selection Process)
सर्वात आधी सगळ्या अर्जाची छाणणी केली जाईल व त्यांनंतर निवडलेल्या उमेदवारांना खालील परीक्षेसाठी बोलवले जाणार.
1] ट्रेड टेस्ट (Trade Test)
- सर्व पदांसाठी अनिवार्य
- पात्रता स्वरूपाचा (Qualifying Nature)
- उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल
2] लेखी परीक्षा (Written Examination)
▪️तंत्रज्ञ (Technician-I) साठी परीक्षा :
| पेपर | प्रश्नांची संख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Paper-I – मानसिक क्षमता चाचणी | 50 | 100 | 1 तास |
| Paper-II – सामान्य जागरूकता आणि इंग्रजी भाषा | 50 (25+25) | 150 | 30 मिनिटे |
| Paper-III – संबंधित विषय | 50 | 150 | 1.5 तास |
एकूण प्रश्न – 150 | एकूण वेळ – 2 तास 30 मिनिटे | एकूण गुण – 400
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी -1 गुण वजा (PAPER-I व PAPER-II)
▪️तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) साठी परीक्षा :
| पेपर | प्रश्नांची संख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Paper-I – मानसिक क्षमता चाचणी | 50 | 100 | 1 तास |
| Paper-II – सामान्य जागरूकता आणि इंग्रजी भाषा | 50 (25+25) | 150 | 30 मिनिटे |
| Paper-III – संबंधित विषय | 100 | 300 | 1.5 तास |
एकूण प्रश्न – 200 | एकूण वेळ – 3 तास | एकूण गुण – 550
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी – 1 गुण वजा (PAPER-I व PAPER-II)
▪️परीक्षा प्रकार : OMR आधारित किंवा संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा
▪️परीक्षा माध्यम : इंग्रजी भाषा विषयाचे प्रश्न सोडून सर्व प्रश्न इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये असतील.
3] अंतिम गुणवत्ता यादी
- Paper-I मध्ये किमान निश्चित गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचे Paper-II आणि Paper-III चे मूल्यमापन केले जाईल
- Paper-II आणि Paper-III मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
1] अधिकृत वेबसाइट https://recruit.ncl.res.in वर भेट द्या
2] “Apply Online” लिंकवर क्लिक करा
3] नोंदणी करा आणि वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर प्रदान करा
4] ऑनलाइन अर्ज फॉर्म पूर्ण माहितीसह भरा
5] आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
- अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (JPG/JPEG फॉरमॅट, 20-100 KB)
- स्वाक्षरी (JPG/JPEG फॉरमॅट, 10-50 KB)
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, ITI, 12वी, पदवी/डिप्लोमा)
- जन्मतारीख पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- भूतपूर्व सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- हरकत नाही प्रमाणपत्र (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी)
6] अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास)
7] अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या
अर्ज शुल्क ( APPLICATION FEES)
| अनारक्षित (UR), OBC, EWS | ₹ 500/- |
| महिला/SC/ST/PwBD/भूतपूर्व सैनिक/CSIR कायमस्वरूपी कर्मचारी | शुल्कमुक्त |
⚠️ सूचना : नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा NEFT/RTGS द्वारे ऑनलाइन शुल्क भरता येईल. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे (IMPORTANT DOCUMENTS)
✓ जन्मतारखेचा पुरावा (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र)
✓ सर्व शैक्षणिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे
✓ संगणक प्रमाणपत्र
✓ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✓ आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा वाहन परवाना
✓ अनुभव प्रमाणपत्र
✓ ना-हरकत प्रमाणपत्र (शासकीय कर्मचाऱ्यांसाठी)
संपर्क माहिती (CONTACT DETAILS)
▪️ई-मेल : recruit.ncl@csir.res.in
▪️अधिकृत वेबसाइट : https://recruit.ncl.res.in
▪️पत्ता : सीएसआईआर – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला, डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे – 411008, महाराष्ट्र
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1] अर्ज कसा करावा?
उत्तर: केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. अधिकृत वेबसाइट https://recruit.ncl.res.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. हार्ड कॉपी पाठवण्याची गरज नाही.
2] अर्जाची शेवटची तारीख कधी आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2026, संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.
3] एकाच उमेदवाराने किती पदांसाठी अर्ज करता येईल?
उत्तर: उमेदवार एकाधिक पदांसाठी अर्ज करू शकतो, परंतु प्रत्येक पदकोडसाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क भरावे लागेल.
4] अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: UR/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹500/- प्रत्येक पदासाठी. SC/ST/PwBD/महिला/भूतपूर्व सैनिक/CSIR कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी शुल्कमुक्त.
5] 10वीमध्ये 55% पेक्षा कमी गुण आहेत, अर्ज करता येईल का?
उत्तर: नाही. तंत्रज्ञ-I साठी 10वीमध्ये विज्ञान विषयांसह किमान 55% गुण अनिवार्य आहेत.
6] कमाल वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: दोन्ही पदांसाठी (तंत्रज्ञ-I आणि तांत्रिक सहाय्यक) कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे (12 जानेवारी 2026 नुसार).
7] निवड प्रक्रियेत किती टप्पे आहेत?
उत्तर: तीन मुख्य टप्पे आहेत – 1) ट्रेड टेस्ट (पात्रता स्वरूपाचा), 2) लेखी परीक्षा (तीन पेपर), 3) कागदपत्र सत्यापन.
8] परीक्षा कोणत्या भाषेत असेल?
उत्तर: इंग्रजी भाषा विषयाचे प्रश्न सोडून सर्व प्रश्न इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये असतील.
9] अंतिम गुणवत्ता यादी कशी तयार केली जाईल?
उत्तर: Paper-II आणि Paper-III मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. Paper-I मध्ये फक्त किमान पात्रता गुण मिळवावे लागतील.
10] अनुभव कधीपासून मोजला जाईल?
उत्तर: अनुभव केवळ आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतरच मोजला जाईल.