भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Boards – RRBs) ने केंद्रीकृत रोजगार अधिसूचना क्र. 08/2025 अंतर्गत विविध विभक्त श्रेणीतील (Isolated Categories) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण 312 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. हे पद विविध रेल्वे झोन आणि उत्पादन युनिट्समध्ये उपलब्ध आहेत. या नोकरीची सर्वसाधारण माहिती, पात्रता निकष, वेतनमान, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची तारखा या लेखात विस्तृतपणे दिली आहे. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.
▪️भरती विभाग – रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Boards – RRBs)
▪️भरती प्रकार – ही भरती भारत सरकार (Goverment Of India) मार्फत राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 312 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
Table of Contents
Toggleपदाचे तपशील (Post Details)
▪️या भरतीअंतर्गत खालील 8 पदांवर नियुक्ती होणार आहे
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| Chief Law Assistant | 22 |
| Public Prosecutor | 7 |
| Junior Translator (Hindi) | 202 |
| Senior Publicity Inspector | 15 |
| Staff and Welfare Inspector | 24 |
| Scientific Assistant (Training) | 2 |
| Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist) | 39 |
| Scientific Supervisor (Ergonomics and Training) | 1 |
| एकूण | 312 |
शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)
1] Chief Law Assistant
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्यातील पदवी (Law Degree)
- वकिलात 3 वर्षांचा सराव अनुभव
- किंवा रेल्वे कर्मचारी असल्यास Law Graduate + 5 वर्षांचा सेवा अनुभव
2] Public Prosecutor
- Law मध्ये पदवी + 5 वर्षांचा Advocate म्हणून सराव
3] Junior Translator (Hindi)
- हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी (Master’s Degree)
- किंवा इतर कोणत्याही विषयात पदव्युत्तर + हिंदी ते इंग्रजी भाषांतरात डिप्लोमा/प्रमाणपत्र
- किंवा 2 वर्षांचा भाषांतर अनुभव
4] Senior Publicity Inspector
- पदवी + जनसंपर्क/जाहिरात/पत्रकारिता/मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा
5] Staff and Welfare Inspector
- पदवी + Labour/Social Welfare मध्ये डिप्लोमा
- किंवा Labour Laws मध्ये डिप्लोमा
- किंवा LLB with Labour Laws
- किंवा Personnel Management मध्ये PG Diploma/MBA
6] Scientific Assistant (Training)
- Psychology विषयात द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी
- Psychological Tests च्या प्रशासनात 1 वर्षाचा अनुभव
7] Lab Assistant Grade III
- 12वी उत्तीर्ण (Physics आणि Chemistry विषयासह)
8] Scientific Supervisor
- Psychology किंवा Physiology मध्ये द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी
- 2 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव
▪️महत्त्वाचे: ज्या उमेदवारांचे अंतिम निकाल अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर जाहीर होणार आहे, त्यांनी अर्ज करू नये.
वेतनश्रेणी (PAY SCALE)
▪️वेतन 7व्या वेतन आयोगानुसार आहे. या व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर लाभ मिळतील.
| पदाचे नाव | Pay Level | प्रारंभिक वेतन (₹) |
|---|---|---|
| Chief Law Assistant | Level 7 | ₹44,900 |
| Public Prosecutor | Level 7 | ₹44,900 |
| Junior Translator (Hindi) | Level 6 | ₹35,400 |
| Senior Publicity Inspector | Level 6 | ₹35,400 |
| Staff and Welfare Inspector | Level 6 | ₹35,400 |
| Scientific Assistant (Training) | Level 6 | ₹35,400 |
| Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist) | Level 2 | ₹19,900 |
| Scientific Supervisor (Ergonomics and Training) | Level 7 | ₹44,900 |
वयोमर्यादा (Age Limit)
▪️वयोमर्यादा गणण्याचा दिनांक – 01-01-2026
| पदाचे नाव | वयोमर्यादा |
|---|---|
| Chief Law Assistant | 18-40 वर्षे |
| Public Prosecutor | 18-32 वर्षे |
| Junior Translator (Hindi) | 18-33 वर्षे |
| Senior Publicity Inspector | 18-33 वर्षे |
| Staff and Welfare Inspector | 18-33 वर्षे |
| Scientific Assistant (Training) | 18-35 वर्षे |
| Lab Assistant Grade III (Chemist & Metallurgist) | 18-30 वर्षे |
| Scientific Supervisor (Ergonomics and Training) | 18-35 वर्षे |
▪️वयोमर्यादा सवलत
| कॅटेगरी | वयोमर्यादा सवलत |
|---|---|
| SC/ST | 5 वर्षे |
| OBC-NCL | 3 वर्षे |
| EWS | नाही |
| PwBD (UR) | 10 वर्षे |
| PwBD (OBC) | 13 वर्षे |
| PwBD (SC/ST) | 15 वर्षे |
| माजी सैनिक (Ex-Servicemen) | 3-8 वर्षे (श्रेणीनुसार) |
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 30 डिसेंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29 जानेवारी 2026 |
| परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 31 जानेवारी 2026 |
| अर्जातील सुधारणा (Modification Window) | 1 फेब्रुवारी 2026 ते 10 फेब्रुवारी 2026 |
| Scribe तपशील भरण्याची तारीख | 11 फेब्रुवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2026 |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
| अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया (Selection Process)
1] संगणक आधारित परीक्षा (Computer Based Test – CBT)
- एक टप्प्याची परीक्षा – (Single Stage CBT)
- प्रश्नांची संख्या – 100 प्रश्न
- एकूण गुण – 100 गुण
- कालावधी – 90 मिनिटे (Scribe साठी 120 मिनिटे)
- चुकीच्या उत्तरासाठी – 1/3 गुण कपात (Negative Marking)
▪️CBT मधील विषय (Junior Translator वगळता सर्व पदांसाठी) –
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| Professional Ability | 50 | 50 |
| General Awareness | 15 | 15 |
| General Intelligence & Reasoning | 15 | 15 |
| Mathematics | 10 | 10 |
| General Science | 10 | 10 |
| एकूण | 100 | 100 |
उत्तीर्ण गुण:
- UR/EWS – 40%
- OBC-NCL – 30%
- SC/ST – 30%/25%
2] Junior Translator साठी Translation Test:
- CBT नंतर भाषांतर परीक्षा (Qualifying Test)
- केवळ 60% गुण मिळवणाऱ्यांनाच पुढे विचारात घेतले जाईल
- रिक्त जागांच्या 10 पटीच्या उमेदवारांना बोलावले जाईल
3] कागदपत्र पडताळणी (Document Verification):
- CBT/Translation Test मधील गुणांनुसार मेरिट यादी
- मूळ प्रमाणपत्रे सादर करावी लागतील
4] वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
- रेल्वे वैद्यकीय मानकांनुसार तपासणी
अर्ज प्रक्रिया ( APPLICATION PROCESS)
▪️ऑनलाइन अर्ज प्रक्रिया –
Step 1] Account तयार करा
- RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जा
- “Create Account” वर क्लिक करा
- मोबाइल नंबर आणि Email ID टाका (OTP द्वारे सत्यापित)
- सूचना – जर तुम्ही 2024/2025 च्या CEN साठी आधीच Account तयार केले असेल तर तेच वापरा
Step 2] Application Form भरा
- Login करा
- “Apply for CEN 08/2025” निवडा
- सर्व माहिती काळजीपूर्वक भरा –
- वैयक्तिक माहिती
- शैक्षणिक तपशील
- पदाची निवड आणि RRB निवड
- Live Photo Capture (Webcam किंवा Mobile Camera द्वारे)
- Signature Upload (JPG format, 30-49 KB, Running Handwriting मध्ये)
- आवश्यक प्रमाणपत्रे Upload करा
Step 3] परीक्षा शुल्क भरा
- Online payment – Net Banking/Debit Card/Credit Card/UPI
Step 4] अर्ज सबमिट करा
- सर्व माहिती तपासून “Final Submit” करा
- Registration Number आणि Email ID जतन करा
▪️महत्त्वाच्या सूचना –
✅ केवळ एकाच RRB साठी अर्ज करा (एकापेक्षा जास्त RRB ला अर्ज केल्यास सर्व अर्ज फेटाळले जातील)
✅ Live Photo स्पष्ट असावा (काळ्या रंगाचे कपडे, पांढऱ्या पार्श्वभूमीसह)
✅ Signature चालू हस्ताक्षरात (CAPITAL letters नाही)
✅ Aadhaar/DigiLocker द्वारे ओळख सत्यापित करणे शिफारसीय
✅ SC/ST उमेदवारांना मोफत रेल्वे प्रवासाची सोय
अर्ज शुल्क ( APPLICATION FEES)
| कॅटेगरी | शुल्क |
|---|---|
| सर्वसाधारण/OBC-NCL/EWS | ₹500/- |
| SC/ST/PwBD/Female/Transgender/Ex-Servicemen/Minority/EBC | ₹250/- |
नोंद – परीक्षेत उपस्थित राहिल्यास ₹400 (सर्वसाधारण) किंवा ₹250 (सवलत श्रेणी) परतावा दिला जाईल.
शुल्क भरण्याची पद्धत – केवळ ऑनलाइन – Internet Banking, Debit/Credit Card, UPI
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
▪️कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील मूळ प्रमाणपत्रे सादर करावी लागतील:
- जन्म दाखला/SSC प्रमाणपत्र (वयाच्या पुराव्यासाठी)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (सर्व गुणपत्रिका)
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL साठी, विहित स्वरूपात)
- EWS प्रमाणपत्र (उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र)
- दिव्यांगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी, 40% किंवा त्याहून अधिक)
- माजी सैनिक प्रमाणपत्र (Ex-SM उमेदवारांसाठी)
- फोटो ओळखपत्र (Aadhaar/PAN/Driving License/Passport)
- सेवेत असणाऱ्यांसाठी NOC (No Objection Certificate)
- रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो (2 महिन्यांपेक्षा जुने नसावे)
संपर्क माहिती (CONTACT DETAILS)
Email – rrb.help@csc.gov.in
Phone – 9592001188, 01725653333
वेळ – सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 (कामकाजाच्या दिवशी)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1] ही भरती कोण आयोजित करत आहे?
उत्तर: ही भरती Railway Recruitment Board (RRB) मार्फत, भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित केली आहे.
2] एकूण किती पदांसाठी भरती आहे?
उत्तर: एकूण 312 जागा भरल्या जाणार आहेत.
3] अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: 29 जानेवारी 2026, अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
4] अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: UR / OBC-NCL / EWS – ₹500/- | SC / ST / PwBD / Female / Ex-Servicemen / Minority / EBC – ₹250/-
👉 परीक्षा दिल्यानंतर पूर्ण किंवा अंशतः शुल्क परतावा मिळतो.
5] एकापेक्षा जास्त RRB साठी अर्ज करू शकतो का?
उत्तर: नाही. फक्त एका RRB साठीच अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द होतील.
6] ) Junior Translator साठी वेगळी परीक्षा आहे का?
उत्तर: होय. CBT नंतर Translation Test (Qualifying) घेतली जाईल.
7] शैक्षणिक पात्रता एकसारखी आहे का?
उत्तर: नाही. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे (Law, Hindi Translator, Psychology, Science, 12वी इ.).
8] अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात का?
उत्तर: नाही.अंतिम निकाल अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत जाहीर झालेला असावा.
9] निवड झाल्यानंतर पोस्टिंग कुठे मिळेल?
उत्तर: पोस्टिंग विविध रेल्वे झोन किंवा उत्पादन युनिट्समध्ये होऊ शकते (All India Level).
10] मेडिकल टेस्ट आवश्यक आहे का?
उत्तर: होय. निवडीनंतर Railway Medical Standards नुसार वैद्यकीय तपासणी होईल.