महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2026 साठी एकूण 87 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. MPSC Rajyaseva Recruitment 2026 मध्ये विविध विभागांतर्गत या प्रतिष्ठित पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली Mpsc rajyaseva recruitment 2026 notification (अधिकृत जाहिरात) वाचून ऑनलाइन अर्ज करावा.
▪️भरती विभाग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
▪️भरती प्रकार – ही भरती राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) द्वारे राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 87 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
Table of Contents
Toggleपदाचे तपशील (Post Details)
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 87 पदे भरण्यात येणार आहेत:
▪️विभागानुसार पदे –
| विभाग | संवर्ग | एकूण पदे |
|---|---|---|
| सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा गट-अ व गट-ब | 79 |
| महसूल व वन विभाग | महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा | 08 |
▪️राज्य सेवा (पदे) –
- उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ – 13 पदे
- सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 32 पदे
- सहायक गट विकास अधिकारी, गट-ब – 30 पदे
- उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब – 04 पदे
▪️महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा (पदे) –
- पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ- 08 पदे
शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)
▪️राज्य सेवा परीक्षेसाठी
1] सामान्य पदांसाठी –
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता
2] सहायक संचालक (वित्त व लेखा सेवा) साठी –
- वाणिज्य शाखेची स्नातक पदवी (किमान ५५% गुणांसह), किंवा
- सनदी लेखापाल अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा
- परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा
- वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा
- वित्त व्यवसाय प्रशासनात MBA
3] उद्योग अधिकारी (तांत्रिक) साठी –
- अभियांत्रिकी मधील पदवी (BE/B.Tech), किंवा
- विज्ञान शाखेतील पदवी
▪️महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेसाठी
- पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मधील पदवी (B.V.Sc.)
- महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, 1971 अन्वये नोंदणी आवश्यक
- महत्वाचे: मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वेतनश्रेणी (PAY SCALE)
प्रत्येक संवर्गाच्या वेतनश्रेणी संबंधित सेवाप्रवेश नियमानुसार राहील. गट-अ व गट-ब पदांसाठी महाराष्ट्र शासनाच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन देण्यात येईल.
वयोमर्यादा (Age Limit)
▪️वयोमार्यादा गणण्याचा दिनांक –
- बहुतेक संवर्गांसाठी – 1 एप्रिल, 2026
- उद्योग अधिकारी (तांत्रिक) आणि पशुवैद्यकीय अधिकारी साठी – 20 जानेवारी, 2026
| किमान वय | कमाल वय |
| 18/19 वर्ष | 38 वर्ष |
▪️वयोमर्यादा सवलत –
| कॅटेगरी | कमाल वय |
|---|---|
| मागासवर्गीय | 43 वर्ष |
| आ.दु.घ. | 43 वर्ष |
| अनाथ | 43 वर्ष |
| प्राविण्य प्राप्त खेळाडू | 43 वर्ष |
| दिव्यांग | 48 वर्ष |
| माजी सैनिक | 48 वर्ष |
महत्वाच्या तारखा (Mpsc Rajyaseva Recruitment 2026 Dates)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 31 डिसेंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 जानेवारी 2026 |
| ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख | 20 जानेवारी 2026 |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
| अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया (Selection Process)
▪️निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये राबविली जाईल:
1] संयुक्त पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
- तारीख – 31 मे, 2026 (रविवार)
- गुण – 200 गुण
- स्वरूप – वस्तुनिष्ठ प्रश्न (Objective Type)
- केंद्रे – महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर
2] मुख्य परीक्षा (Main Exam)
- गुण – राज्य सेवा – 800 गुण, पशुवैद्यकीय सेवा – 400 गुण
- स्वरूप – वर्णनात्मक (Descriptive)
- विषय – वैकल्पिक विषय निवड आवश्यक
3] मुलाखत (Interview)
- गुण – राज्य सेवा – 100 गुण, पशुवैद्यकीय सेवा – 100 गुण
- मुलाखतीपूर्वी किंवा नंतर वैद्यकीय तपासणी
⚠️ महत्वाचे: पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी मानले जातील. अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या एकत्रित गुणांवर होईल.
अर्ज प्रक्रिया ( APPLICATION PROCESS)
Step 1] खाते तयार करणे
- आयोगाच्या संकेतस्थळावर https://mpsconline.gov.in भेट द्या
- नवीन खाते तयार करा किंवा विद्यमान खाते अद्ययावत करा
Step 2] अर्ज भरणे
- सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा
- सेवा व संवर्गाचा विकल्प द्या
- राज्यसेवेसाठी वैकल्पिक विषय निवडा
- उत्तरे लिहिण्याचे माध्यम (मराठी/इंग्रजी) निवडा
Step 3] कागदपत्रे अपलोड करणे
आवश्यक कागदपत्रे (लागू असल्यास):
- सामाजिक प्रवर्गाचे प्रमाणपत्र
- नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (2025-2026)
- EWS प्रमाणपत्र (2025-2026)
- दिव्यांग प्रमाणपत्र (किमान 40%)
- खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल
- अनाथ प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Step 4] परीक्षा शुल्क भरणे
- ऑनलाइन पद्धतीने किंवा SBI चलनाद्वारे
- पेमेंट यशस्वी झाल्याची खात्री करा
Step 5] जिल्हा केंद्र निवडणे
- परीक्षा देण्यासाठी जिल्हा केंद्र निवडा
- एकदा निवडलेले केंद्र बदलता येणार नाही
Step 6] KYC प्रक्रिया पूर्ण करणे
- आयोगाच्या सूचनांनुसार KYC प्रक्रिया पूर्ण करा
⚠️ महत्वाचे सूचना –
- फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील
- एक उमेदवार – एक अर्ज या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करा
- सर्व माहिती अचूक भरा – चुकीच्या माहितीमुळे अर्ज रद्द होऊ शकतो
- प्रवेशप्रमाणपत्र परीक्षेपूर्वी ७ दिवस अगोदर ऑनलाइन उपलब्ध होईल
- परीक्षेच्यावेळी मूळ ओळखपत्र (Aadhaar Card/Voter ID/Passport/PAN Card/Driving License) आवश्यक
अर्ज शुल्क ( APPLICATION FEES)
| कॅटेगरी | शुल्क |
|---|---|
| अराखीव (खुला) | रु. 544/- |
| मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग | रु. 344/- |
⚠️ नोंद –
- वरील शुल्कावर बँक चार्जेस व देयक वेगळे असतील
- परीक्षा शुल्क ना-परतावा आहे
- शुल्क भरण्याच्या पद्धती: ऑनलाइन (Credit/Debit Card, Net Banking) किंवा SBI बँकेत चलनाद्वारे
संपर्क माहिती (CONTACT DETAILS)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग – त्रिशूल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर 34, सेक्टर 11,
सरोवर विहार समोर, बेलापूर सीबीडी,
नवी मुंबई – 400614
दूरध्वनी: 022-69385900
ई-मेल: contact-secretary@mpsc.gov.in
संकेतस्थळ: https://mpsc.gov.in, https://mpsconline.gov.in
Social Media:
Twitter – @mpsc_office
Instagram – @official_mpsc
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्र. 1] या भरतीसाठी एकूण किती पदे आहेत?
उत्तर: या भरतीसाठी एकूण 87 पदे आहेत. यापैकी राज्य सेवा गट-अ व गट-ब साठी 76 पदे आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेसाठी 08 पदे आहेत.
प्र. 2] परीक्षेची तारीख कधी आहे?
उत्तर: संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, 31 मे, 2026 रोजी घेण्यात येईल.
प्र. 3] परीक्षा कोठे होणार आहे?
उत्तर: परीक्षा महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.
प्र. 4] अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज करण्यासाठी https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
प्र. 5] अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी, 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.
प्र. 6] एकाच उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो का?
उत्तर: नाही. एक उमेदवार – एक अर्ज हे नियम काटेकोरपणे पाळावे. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील.
प्र. 7] परीक्षा शुल्क किती आहे?
उत्तर: 1] अराखीव (खुला) प्रवर्ग: रु. 544/- | 2] मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: रु. 344/- (वरील शुल्कावर बँक चार्जेस व देयक वेगळे असतील)
प्र. 8] राज्य सेवा परीक्षेसाठी किमान शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आवश्यक आहे. विशिष्ट संवर्गासाठी विशेष अर्हता आवश्यक आहे.
प्र. 9] पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी कोणती अर्हता आवश्यक आहे?
उत्तर: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मधील पदवी (B.V.Sc.) आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, 1971 अन्वये नोंदणी
प्र. 10] मराठी भाषा जाणणे आवश्यक आहे का?
उत्तर: होय. सर्व संवर्गांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.