महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2026 – 332 पदांसाठी अर्ज सुरू | POLICE PATIL RECRUITMENT

January 14, 2026 by

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तीन उपविभागांमध्ये एकूण 332 पोलीस पाटील पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस पाटील या पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवार 26 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.

WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा


▪️भरती विभाग – महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, हिंगोली
▪️भरती प्रकार – ही भरती राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) द्वारे राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 332 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – हिंगोली, महाराष्ट्र

पदाचे तपशील (Post Details)

पदाचे नावपोलीस पाटील
हिंगोली उपविभाग एकूण पदे134 पदे
वसमत उपविभाग एकूण पदे113 पदे
कळमनुरी उपविभाग एकूण पदे85 पदे
एकूण पदे –332 पदे

शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)

  • उमेदवार किमान दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

▪️अन्य अनिवार्य अटी –

  1. अधिवास: उमेदवार संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा (तहसिल कार्यालयाकडील वय व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक)
  2. शारीरिक सक्षमता: उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा
  3. चारित्र्य: निष्कलंक चारित्र्य असणे आवश्यक
  4. लहान कुटुंब: महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 नुसार दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत
  5. आधार व मोबाईल: अर्जामध्ये आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य

वेतनश्रेणी (PAY SCALE)

  • अंदाजे मासिक वेतन (रु. 15,000/- ते रु. 25,000/-)
  • मिळणारे भत्ते (DA, मानधन, प्रोत्साहन भत्ता इ.)
  • सेवानिवृत्ती लाभ आणि इतर सुविधा

वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय: 25 वर्षे
  • कमाल वय: 45 वर्षे
  • संदर्भ तारीख: 26 जानेवारी 2026
  • महत्वाची नोंद: पोलीस पाटील पदांकरिता वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार नाही.
WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा


महत्वाच्या तारखा (Important Dates)

कार्यक्रमतारीख
ऑनलाईन अर्ज सुरुवात12 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 जानेवारी 2026
पात्र/अपात्र उमेदवारांची यादी29 जानेवारी 2026
प्रवेशपत्र डाऊनलोड1 फेब्रुवारी 2026 पासून
लेखी परीक्षा8 फेब्रुवारी 2026
कागदपत्र तपासणी व मुलाखत11 ते 13 फेब्रुवारी 2026

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात [उपविभाग हिंगोली]येथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात [उपविभाग वसमत]येथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात [उपविभाग कळमनुरी]येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

निवड प्रक्रिया (SELECTION PROCESS)

  1. लेखी परीक्षा – 80 गुण
  2. कागदपत्रे पडताळणी
  3. मौखिक परीक्षा/मुलाखत – 20 गुण
  4. वैद्यकीय तपासणी
  5. अंतिम गुणवत्ता यादी

▪️समान गुण मिळाल्यास प्राधान्यक्रम

  1. पोलीस पाटलांचे वारस (पती, पत्नी आणि दोन मुले)
  2. उच्च शैक्षणिक अर्हता धारक
  3. माजी सैनिक
  4. वयाने जेष्ठ उमेदवार

परीक्षेचा तपशील (EXAM DETAILS)

1] लेखी परीक्षा (80 गुण)

  • प्रश्नपत्रिका – वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची
  • एकूण प्रश्न – 80 (प्रत्येक 1 गुणाचा)
  • अभ्यासक्रम – इयत्ता दहावी (एस.एस.सी.) पर्यंतचा
  • विषय – सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इ.
  • किमान उत्तीर्ण गुण – 36 गुण (45%)

2] मौखिक परीक्षा/मुलाखत (20 गुण)

  • लेखी परीक्षेत किमान 36 गुण मिळवणारे उमेदवार मुलाखतीस पात्र

3] एकूण गुण – 100

⚠️ विशेष सूचना – लेखी परीक्षेत उत्तरपत्रिकेवर चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापरावा.

अर्ज प्रक्रिया (APPLICATION PROCESS)

▪️संकेतस्थळ – https://hingolipp.recruitonline.in

▪️अर्ज भरण्याची पायऱ्या

  1. नोंदणी: सर्वप्रथम वेबसाईटवर जाऊन Login ID आणि Password तयार करा
  2. माहिती भरा: सर्व रकान्यात आपली माहिती अचूक भरा
  3. गाव निवड: आपल्या गावाचे नाव आणि आरक्षण खात्रीपूर्वक तपासून निवडा
  4. फोटो अपलोड: लगतच्या 6 महिन्यातील रंगीत फोटो आणि सही अपलोड करा
  5. पुनर्वलोकन: सर्व माहिती तपासून “Save and Continue” वर क्लिक करा
  6. परीक्षा शुल्क: UPI द्वारे QR Code स्कॅन करून शुल्क भरा
  7. प्रिंट: अर्जाची प्रत काढून ठेवा

⚠️ महत्वाच्या सूचना

  • एकाच गावासाठी अर्ज: एकापेक्षा जास्त गावांसाठी केलेले अर्ज बाद होतील
  • आरक्षण तपासा: आरक्षणाव्यतिरिक्त उमेदवारांनी अर्ज करू नये
  • मोबाईल क्रमांक: योग्य मोबाईल क्रमांक द्या; DND सेवा बंद करा
  • प्रवेशपत्र: 1 फेब्रुवारी 2026 पासून स्वतः डाऊनलोड करावे

अर्ज शुल्क (APPLICATION FEE)

कॅटेगरीशुल्क
खुला प्रवर्गरु. 1000/-
आरक्षित/EWS प्रवर्गरु. 800/-

⚠️ भरणा पद्धत – ऑनलाईन UPI – PhonePe, GPay इत्यादीद्वारे QR Code स्कॅन करून.
⚠️ महत्वाची सूचना – एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे (REQUIRED DOCUMENTS)

कागदपत्र पडताळणीच्या वेळी –

  1. शैक्षणिक प्रमाणपत्रे (मूळ + प्रत)
  2. वय व अधिवास प्रमाणपत्र
  3. जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  4. नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  5. शारीरिक सक्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र (जिल्हा शल्य चिकित्सक)
  6. चारित्र्य प्रमाणपत्र (पोलीस स्टेशन)
  7. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र
  8. रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र (राजकीय संबंध नसल्याबाबत)

संपर्क माहिती (CONTACT DETAILS)

1] हिंगोली उपविभाग

  • कार्यालय – उपविभागीय अधिकारी, हिंगोली
  • दूरध्वनी – 02456-221452
  • ई-मेल – sdohingolil23@gmail.com

2] वसमत उपविभाग

  • कार्यालय – उपविभागीय अधिकारी, वसमत
  • दूरध्वनी – 02454-220016
  • ई-मेल – sdobasmath0@gmail.com

3] कळमनुरी उपविभाग

  • कार्यालय – उपविभागीय अधिकारी, कळमनुरी
  • ई-मेल – sdokalamnuri@gmail.com

▪️हेल्पलाइन

  • क्रमांक – 9689911007
  • वेळ – सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र. 1] एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त गावांसाठी अर्ज करता येईल का?
उत्तर: नाही. फक्त एका गावासाठीच अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त गावांसाठी अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.

प्र. 2] या भरतीमध्ये एकूण किती पदे आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 333 पदे आहेत.

प्र. 3] अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2026 आहे.

प्र. 4] अर्ज पद्धत कोणती आहे?
उत्तर: अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिकृत वेबसाइट: https://hingolipp.recruitonline.in

प्र. 5] शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवार किमान 10वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्र. 6] वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान वय – 25 वर्षे / कमाल वय – 45 वर्षे.

प्र. 7] अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: खुला प्रवर्ग – ₹1000/-, आरक्षित / EWS प्रवर्ग – ₹800/-, भरणा – UPI (PhonePe, GPay इ.) द्वारे QR Code स्कॅन करून

प्र. 8] मुलाखत (Oral Test) किती गुणांची आहे?
उत्तर: मुलाखत 20 गुणांची आहे. लेखी परीक्षेत किमान 36 गुण मिळवलेले उमेदवारच पात्र ठरतील.

प्र. 9] प्रवेशपत्र (Hall Ticket) कधी मिळेल?
उत्तर: 1 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन डाऊनलोड करता येईल.

प्र. 10] पोलीस पाटील हे शासकीय कायम पद आहे का?
उत्तर: होय. पोलीस पाटील हे महसूल विभागाअंतर्गत शासकीय पद आहे, परंतु वर्गीकृत नसलेले (Unclassified) आहे.