Mumbai Mahanagar Pradesh Vikas Pradhikaran Bharti 2026 – मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी दि. 18 फेब्रुवारी, 2026 रोजी जाहिरात क्रमांक 01/2026 प्रसिद्ध केली असून, गट-अ, गट-ब आणि गट-क या संवर्गातील एकूण 235 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या लेखात तुम्हाला Mumbai Mahanagar Pradesh Vikas Pradhikaran Bharti 2026 संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत मिळेल.
Table of Contents
Toggleझटपट माहिती – MUMBAI MAHANAGAR PRADESH VIKAS PRADHIKARAN BHARTI 2026
| तपशील | माहिती |
|---|---|
| संस्थेचे नाव | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) |
| जाहिरात क्रमांक | मुं.म.प्र.वि.प्रा. 01/2026 |
| एकूण रिक्त पदे | 235 |
| अर्ज सुरू दिनांक | 18 फेब्रुवारी, 2026 |
| अर्ज अंतिम दिनांक | 20 मार्च, 2026 |
| परीक्षा शुल्क अंतिम दिनांक | 20 मार्च, 2026 |
| अर्ज पद्धत | फक्त ऑनलाईन |
| अधिकृत संकेतस्थळ | https://mmrda.maharashtra.gov.in |
पदाचे तपशील – MMRDA भरती 2026
Mumbai Mahanagar Pradesh Vikas Pradhikaran Bharti 2026 अंतर्गत खालील 16 प्रकारच्या पदांसाठी भरती होणार आहे:

| पदनाम | वर्ग | वेतनस्तर (७वा वे.आ.) | पदसंख्या |
|---|---|---|---|
| सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) | अ | (S-20) ₹56,100 – ₹1,77,500 | 07 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (रेलपथ) | अ | (S-20) ₹56,100 – ₹1,77,500 | 01 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (संकेत व दूरसंचार) | अ | (S-20) ₹56,100 – ₹1,77,500 | 01 |
| उप नियोजक | अ | (S-20) ₹56,100 – ₹1,77,500 | 29 |
| सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक | ब | (S-16) ₹44,900 – ₹1,42,400 | 04 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ब | S-15 / S-14 | 82 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ अभियंता (रेलपथ) | ब | S-15 / S-14 | 04 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ अभियंता (विद्युत) | ब | S-15 / S-14 | 16 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार) | ब | S-15 / S-14 | 02 |
| सहाय्यक समाज विकास अधिकारी | ब | (S-15) ₹41,800 – ₹1,32,300 | 07 |
| सहाय्यक विधी अधिकारी | ब | (S-15) ₹41,800 – ₹1,32,300 | 04 |
| उद्यान विद्या सहाय्यक | ब | (S-15) ₹41,800 – ₹1,32,300 | 02 |
| उप लेखापाल | क | (S-14) ₹38,600 – ₹1,22,800 | 33 |
| लघुटंकलेखक | क | (S-8) ₹25,500 – ₹81,100 | 10 |
| भूमापक | क | (S-8) ₹25,500 – ₹81,100 | 31 |
| संगणक तंत्रज्ञ | क | (S-6) ₹19,900 – ₹63,200 | 02 |
| एकूण | 235 |
शैक्षणिक पात्रता – MMRDA RECRUITMENT 2026 ELIGIBILITY
Mumbai Mahanagar Pradesh Vikas Pradhikaran Bharti 2026 मध्ये प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता विहित करण्यात आली आहे. मी खाली काही प्रमुख पदांची पात्रता थोडक्यात सांगतो:
गट – अ पदे
- सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य/रेलपथ) – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी + 5 वर्षांचा एकूण अनुभव (त्यापैकी किमान 3 वर्षे एस-15 वेतनस्तरावर).
- सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (संकेत व दूरसंचार) – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी + 5 वर्षांचा अनुभव.
- उप नियोजक – वास्तुशास्त्र / स्थापत्य अभियांत्रिकी / नियोजन पदवी + AICTE मान्यताप्राप्त नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी.
गट-ब पदे
- सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ अभियंता – संबंधित शाखेतील पदवी किंवा पदविका. पदवीधारकांना एस-15 तर पदविकाधारकांना एस-14 वेतनस्तर लागू.
- सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक – कोणत्याही शाखेची पदवी + MS-CIT + 5 वर्षांचा भूमी व मिळकत विषयक अनुभव.
- सहाय्यक समाज विकास अधिकारी – समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW) + 3 वर्षांचा अनुभव.
- सहाय्यक विधी अधिकारी – UGC मान्यताप्राप्त विधी शाखेची पदवी + 3 वर्षांचा वकिली/कायदेविषयक अनुभव.
गट – क पदे
- उप लेखापाल – वाणिज्य शाखेतील पदवी (किमान 60% गुण, मागासवर्गीयांसाठी 55%) + MS-CIT + 3 वर्षांचा लेखा/वित्तीय अनुभव.
- लघुटंकलेखक – 10वी उत्तीर्ण + शॉर्टहँड/टायपिंग 80/40 शब्द प्रति मिनिट.
- भूमापक – 10वी उत्तीर्ण + शासन मान्य “सर्वेक्षक” पाठ्यक्रम + MS-CIT + ऑटोकॅड + 2 वर्षांचा अनुभव.
- संगणक तंत्रज्ञ – 10वी + 2 वर्षांचा Computer Hardware & Networking कोर्स + ७ वर्षांचा अनुभव.
⚠️ सूचना – सर्व पदांची शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिराती मध्ये आहे. खालील अधिकृत जाहिरात मी दिलेली आहे.
वयोमर्यादा – MMRDA BHARTI 2026 AGE LIMIT
| प्रवर्ग | किमान वय | कमाल वय |
|---|---|---|
| खुला | 18 वर्षे | 38 वर्षे |
| मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ. / सा.व.शै.मा. | 18 वर्षे | 43 वर्षे |
| प्राविण्यप्राप्त खेळाडू (खुला/मागासवर्गीय) | 18 वर्षे | 43 वर्षे |
| दिव्यांग (खुला) | 18 वर्षे | 45 वर्षे |
| माजी सैनिक | 18 वर्षे | सैनिकी सेवेचा कालावधी + 3 वर्षे अधिक |
| पदवीधर अंशकालीन उमेदवार | 18 वर्षे | 45 / 55 वर्षे |
⚠️ वयोमर्यादा गणण्याचा दिनांक – जाहिरात प्रसिद्ध केलेला दिनांक (दि. 18 फेब्रुवारी, 2026).
निवड प्रक्रिया – MMRDA VACANCY 2026 SELECTION PROCESS
Mumbai Mahanagar Pradesh Vikas Pradhikaran Bharti 2026 ची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे राहील:
1] ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात (MCQ) परीक्षा घेतली जाईल.
2] कागदपत्रे पडताळणी – परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.
3] व्यावसायिक चाचणी (लघुटंकलेखक व भूमापक पदांसाठी) – लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवल्यानंतर व्यावसायिक चाचणी घेतली जाईल.
4] अंतिम निवडसूची – गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार केली जाईल.
परीक्षेचे स्वरूप:
परीक्षेत 5 विषय असतील – मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक/विषयज्ञान. गट-अ व गट-ब पदांसाठी एकूण 100 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटे कालावधी राहील. गट-क पदांसाठी प्रश्नसंख्या व कालावधी पदनिहाय वेगवेगळा आहे.
⚠️ महत्त्वाचे – गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. गट-ब (अराजपत्रित), गट-क पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.
महत्वाच्या लिंक्स – IMPORTANT LINKS
| लिंक नाव | URL |
|---|---|
| अप्लाय लिंक | अप्लाय करा |
| PDF जाहिरात | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| सर्व भरती जाहिराती | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा? – MMRDA RECRUITMENT 2026 APPLY ONLINE

1] MMRDA च्या अधिकृत संकेतस्थळावर जा: https://mmrda.maharashtra.gov.in (Division → Administration → Recruitment)
2] “नवीन वापरकर्त्यांची नोंदणी” (New Registration) वर क्लिक करून प्रोफाईल तयार करा.
3] वैध ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक वापरून नोंदणी पूर्ण करा.
4] सर्व वैयक्तिक, शैक्षणिक व अनुभवाची माहिती अचूकपणे भरा.
5] छायाचित्र (पासपोर्ट आकाराचे, 80 – 200 KB), स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6] ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा.
7] अर्जाची प्रिंट आऊट काढून जतन करा.
परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्ग – रु.1000/-
- मागास प्रवर्ग – रु.900/-
- अनाथ उमेदवार – रु.900/-
- माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक – शुल्क माफ
⚠️ परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरावे. शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे.
महत्त्वाच्या सूचना – IMPORTANT NOTICES
- एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र शुल्क भरणे बंधनकारक आहे.
- अर्जात चुकीची माहिती दिल्यास किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते.
- भरती प्रक्रियेदरम्यान MMRDA च्या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्या कारण सर्व अपडेट्स तिथेच प्रसिद्ध होतात.
- तांत्रिक समस्यांसाठी TCS हेल्पलाइन – 9413165586 (सकाळी 9 ते सायंकाळी 5).
- जाहिरातीसंबंधी समस्यांसाठी MMRDA ई-मेल – vacancymmrda@mailmmrda.maharashtra.gov.in किंवा दूरध्वनी – 022-6596 4000 / 7700 / 7400
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ
प्रश्न 1] MMRDA भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
उत्तर: MUMBAI MAHANAGAR PRADESH VIKAS PRADHIKARAN BHARTI 2026 अंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-क मधील एकूण 235 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
प्रश्न 2] परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहे?
उत्तर: परीक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेतली जाईल. लघुटंकलेखक व भूमापक पदांसाठी अतिरिक्त व्यावसायिक चाचणी होईल.
प्रश्न 3] निवडसूचीत येण्यासाठी किमान किती गुण आवश्यक आहेत?
उत्तर: गुणवत्ता यादीत समावेश होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
प्रश्न 5] एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करता येतो का?
उत्तर: हो, एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करता येतो. मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे.
निष्कर्ष – CONCLUSION
मित्रांनो, MMRDA सारख्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. चांगला पगार, जॉब सिक्युरिटी आणि करिअर ग्रोथ – या सगळ्या गोष्टी इथे मिळू शकतात. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी वेळ न दवडता आजच ऑनलाईन अर्ज सादर करा.
| ⚠️ अस्वीकरण (DISCLAIMER) – वरील माहिती MMRDA यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरात क्र.मुं.म.प्र.वि.प्रा. 01/2026 दिनांक 18 फेब्रुवारी, 2026 वर आधारित आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात अवश्य वाचावी. |
