Mafsu Nagpur Bharti 2026

Mafsu Nagpur Bharti 2026 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात 175 पदांसाठी भरती जाहीर!

February 28, 2026 by

Mafsu Nagpur Bharti 2026 – मित्रांनो, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी 175 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये वरिष्ठ लिपिक, वाहन चालक, प्रयोगशाळा परिचर व ग्रंथालय सहाय्यक असे अनेक इत्यादी पदांसाठी ही भरती होणार आहे. Mafsu Nagpur Bharti 2026 यामध्ये गट ब, क आणि ड अशा विविध पदांचा समावेश आहे. चला तर मग, सविस्तर माहिती जाणून घेऊया.

झटपट माहिती – MAFSU NAGPUR BHARTI 2026

तपशीलमाहिती
संस्थेचे नावमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
पदांचा प्रकारगट ‘ब’, ‘क’, ‘ड’
एकूण पदे175
अर्ज सुरू28 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख20 मार्च 2026
अर्ज पद्धतऑनलाईन

पदांचा तपशील – MAHARASHTRA ANIMAL AND FISHERY SCIENCES UNIVERSITY RECRUITMENT

Mafsu Nagpur Bharti 2026 मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. प्रत्येक पदाचे वेतनश्रेणी आणि रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

गट ‘ब’ पदे

पदनामवेतनश्रेणीरिक्त पदे
अधिदान व लेखाधिकारीएस-15 (41800 – 132300)01
सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक (पशुवैद्यकीय)एस-15 (41800 – 132300)03
अधिष्ठाता यांचे तांत्रिक अधिकारीएस-15 (41800 – 132300)02
रुग्णालय चिकित्सकएस-15 (41800 – 132300)02
सहाय्यक व्यवस्थापक (गुण नियंत्रण)एस-14 (38600 – 122800)01
प्लांट ऑपरेटर (दुग्ध प्रक्रिया)एस-14 (38600 – 122800)01

गट ‘क’ पदे

पदनामवेतनश्रेणीरिक्त पदे
शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञएस-10 (29200 – 92300)02
वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यकएस-10 (29200 – 92300)01
दुग्धशाळा सहाय्यकएस-8 (25500 – 81100)01
क्ष-किरण तंत्रज्ञएस-8 (25500 – 81100)03
पशुचिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक (VLDA)एस-8 (25500 – 81100)08
रुग्णालय तंत्रज्ञएस-8 (25500 – 81100)01
शस्त्रक्रियागृह सहाय्यकएस-8 (25500 – 81100)04
प्रक्षेत्र सहाय्यकएस-8 (25500 – 81100)03
वरिष्ठ लिपिकएस-8 (25500 – 81100)14
वरिष्ठ यांत्रिकएस-8 (25500 – 81100)01
बॉयलर ऑपरेटरएस-8 (25500 – 81100)01
प्राणिसंग्रहालय तंत्रज्ञ (क्यूरेटर)एस-7 (21700 – 69100)02
क्यूरेटर कम स्पेसिमन टेक्निशियनएस-7 (21700 – 69100)02
प्रयोगशाळा सहाय्यक (पशुवैद्यकीय व दुग्ध तंत्रज्ञान)एस-7 (21700 – 69100)08
प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य विज्ञान)एस-7 (21700 – 69100)04
कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यकएस-7 (21700 – 69100)01
औषध भांडारपालएस-6 (19900 – 63200)02
वाहन चालक / रुग्णवाहिका चालकएस-6 (19900 – 63200)07
कनिष्ठ यांत्रिक (यांत्रिकी व शीतकरण)एस-6 (19900 – 63200)01
ग्रंथालय परिचरएस-6 (19900 – 63200)06
प्रयोगशाळा परिचरएस-6 (19900 – 63200)41
ट्रॅक्टर ड्रायव्हर / मशीन ऑपरेटरएस-6 (19900 – 63200)03
व्रणोपचारकएस-6 (19900 – 63200)02
लिपिक नि टंकलेखकएस-6 (19900 – 63200)37
कनिष्ठ भांडारपालएस-6 (19900 – 63200)03
विजतंत्रीएस-6 (19900 – 63200)01
विस्तार प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यकएस-6 (19900 – 63200)02

गट ‘ड’ पदे

पदनामवेतनश्रेणीरिक्त पदे
कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्रीएस-3 (16600 – 52400)02
पशुधन सहाय्यकएस-3 (16600 – 52400)02

शैक्षणिक पात्रता – MAFSU RECRUITMENT 2026 ELIGIBILITY

Mafsu Nagpur Bharti 2026 साठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

  • अधिदान व लेखाधिकारी – B.Com / MBA (Finance) + 3 वर्षे अनुभव
  • सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक (पशुवैद्यकीय) – M.V.Sc. / B.V.Sc. (+ अनुभव आवश्यक)
  • अधिष्ठाता यांचे तांत्रिक अधिकारी (पशुवैद्यक शास्त्र) – M.V.Sc. / B.V.Sc. (+ अनुभव)
  • रुग्णालय चिकित्सक – Veterinary विषयात Master’s Degree
  • सहाय्यक व्यवस्थापक (गुण नियंत्रण) – Dairy Technology पदवी / M.Sc. Dairy
  • प्लांट ऑपरेटर (दुग्ध प्रक्रिया) – Dairy Technology पदवी / M.Sc. Dairy
  • शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ – B.Sc. Nursing
  • वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक – B.Lib.Sc.
  • दुग्धशाळा सहाय्यक – Dairy Technology पदवी / M.Sc. Dairy
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – Radiography Degree / Diploma
  • पशुचिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक (VLDA) – B.Sc. / Livestock & Dairy Diploma + अनुभव
  • रुग्णालय तंत्रज्ञ – B.Sc. Nursing
  • शस्त्रक्रियागृह सहाय्यक – B.Sc. Nursing
  • प्रक्षेत्र सहाय्यक – Livestock/Dairy Diploma
  • वरिष्ठ लिपिक – कोणतीही पदवी + मराठी (30 wpm) / इंग्रजी (40 wpm) टायपिंग
  • वरिष्ठ यांत्रिक – 10वी + ITI (Mechanic)
  • बॉयलर ऑपरेटर – 10वी+ IBR प्रमाणपत्र + 3 वर्षे अनुभव
  • प्राणीसंग्रहालय तंत्रज्ञ (क्युरेटर) – B.Sc./DM.L.T. / M.Sc. (Bio) / Diploma + अनुभव
  • क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियन – B.Sc./DM.L.T. / M.Sc. / Diploma + अनुभव
  • प्रयोगशाळा सहाय्यक (पशुवैद्यकीय व दुग्ध तंत्रज्ञान) – B.Sc./DM.L.T. / M.Sc. / Diploma + अनुभव
  • प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य विज्ञान) – B.Sc./DM.L.T. / M.Sc. / Fishery Diploma + अनुभव
  • कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक – B.Lib.Sc.
  • औषध भांडारपाल – B.Pharmacy
  • वाहनचालक / रुग्णवाहिका चालक – LMV/HMV परवाना + 10वी
  • कनिष्ठ यांत्रिक (शीतकरण) – 10वी + ITI (Refrigeration/AC)
  • ग्रंथालय परिचर – 12वी + Library Diploma
  • प्रयोगशाळा परिचर – B.Sc. / Livestock Diploma
  • ट्रॅक्टर चालक / मशीन ऑपरेटर – Tractor परवाना + 10वी
  • ब्रणोपचारक – Livestock/Dairy Diploma
  • लिपिक नि टंकलेखक – कोणतीही पदवी + टायपिंग (Marathi 30 / English 40 wpm)
  • कनिष्ठ भांडारपाल – कोणतीही पदवी + टायपिंग
  • विजतंत्री – 10वी + ITI (Electrician)
  • विस्तार प्रशिक्षण आणि प्रदर्शन सहाय्यक – Livestock/Dairy Diploma
  • कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्री – 10वी + ITI (Wireman/Electrician)
  • पशुधन सहाय्यक – Livestock/Dairy Diploma

वयोमर्यादा – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती 2026

Mafsu Nagpur Bharti 2026 साठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. वयाची गणना 20 मार्च 2026 या अंतिम तारखेनुसार केली जाईल. किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे.

कॅटेगरीवयोमर्यादा
अराखीव38 वर्षे
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ43 वर्षे
दिव्यांग45 वर्षे
प्राविण्य प्राप्त खेळाडू43 वर्षे
प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त45 वर्षे
अंशकालीन पदवीधर/पदविकाधारक कर्मचारी55 वर्षे

महत्त्वाच्या तारखा – IMPORTANT DATES

या Mafsu Nagpur Bharti 2026 साठी महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे:

कार्यक्रमदिनांक
ऑनलाईन अर्ज सुरू28 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मार्च 2026 (रात्री 11:59 पर्यंत)

निवड प्रक्रिया – MAFSU SELECTION PROCESS

Mafsu Nagpur Bharti 2026 ची निवड प्रक्रिया पूर्णपणे परीक्षा (CBT) वर आधारित आहे.

  1. ऑनलाइन स्पर्धा परीक्षा (CBT) (संगणक आधारित बहुपर्यायी प्रश्न)
  2. कौशल्य चाचणी (वाहन चालक आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर पदांसाठी)

परीक्षेचे स्वरूप पदानुसार वेगळे आहे:

  • लिपिकवर्गीय पदे – मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी – एकूण 100 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटे
  • इतर पदे – सामान्य विषय + तांत्रिक विषय – एकूण 100 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटे

⚠️ उत्तीर्ण होण्यासाठी किमान 45% गुण आवश्यक आहेत.

महत्वाच्या लिंक्स – IMPORTANT LINKS

लिंक नावURL
अप्लाय लिंकअप्लाय करा
PDF जाहिरातयेथे बघा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व भरती जाहिरातीयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

अर्ज कसा कराल? – MAFSU NAGPUR BHARTI APPLY ONLINE

मी नेहमीच सांगतो की, अर्ज करताना छोट्याशा चुकीमुळे मोठा त्रास होऊ शकतो. Mafsu Nagpur Bharti 2026 साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – www.mafsu.ac.in = RECRUITMENT = Online Application for Non-Teaching Posts वर क्लिक करा
  2. नोंदणी करा – वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून
  3. माहिती भरा – वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी अचूक भरा
  4. कागदपत्रे अपलोड करा – फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र इत्यादी
  5. शुल्क भरा – ऑनलाइन शुल्क भरा
  6. अर्ज प्रिंट काढा – अर्जाची प्रत जतन करून ठेवा

अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रु. 900/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक – शुल्क नाही

⚠️ अर्ज शुल्क हे नॉन-रिफंडेबल आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटबँकिंग किंवा UPI द्वारे शुल्क भरता येईल.

आवश्यक कागदपत्रे – REQUIRED DOCUMENTS

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा (एसएससी प्रमाणपत्र)
  • शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र
  • नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (जेथे आवश्यक असेल)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (जेथे लागू असेल)
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • ना हरकत प्रमाणपत्र (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी)

महत्त्वाच्या सूचना – IMPORTANT NOTICES

  • अर्जातील सर्व माहिती अचूक आणि खरी भरा. खोटी माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
  • अंतिम तारखेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज करू नका. तांत्रिक अडचणी येऊ शकतात.
  • सर्व कागदपत्रे सुस्पष्ट स्कॅन करून अपलोड करा.
  • परीक्षेच्या वेळी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा.
  • परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेऊ नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ

प्रश्न 1] MAFSU NAGPUR BHARTI 2026 साठी अर्ज ऑफलाईन करता येईल का?
उत्तर : नाही. फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

प्रश्न 2] परीक्षा कधी होणार?
उत्तर : परीक्षा वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होईल.

प्रश्न 3] महिला आरक्षण किती आहे?
उत्तर : 30% महिला आरक्षण लागू आहे.

प्रश्न 1] दिव्यांग उमेदवारांसाठी किती आरक्षण आहे?
उत्तर : एकूण 4% आरक्षण लागू आहे.

निष्कर्ष – CONCLUSION

मित्रांनो, MAFSU NAGPUR BHARTI 2026 ही पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान आणि प्रशासकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. 175 पदे, विविध गट, शासनमान्य वेतन आणि स्थिर नोकरी – ही संधी गमावू नका.

आजच अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करा आणि तयारी सुरू करा!

⚠️अस्वीकृती (Disclaimer) – या लेखातील सर्व माहिती MAFSU च्या अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील जाहिरात आवश्यक तपासा.