Central Bank of India Bharti 2026

Central Bank of India Bharti 2026 | 275 स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदांसाठी भरती | ₹1.20 लाख वेतन | ऑनलाइन अर्ज सुरू!

March 1, 2026 by

Central Bank of India Bharti 2026 – मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने 275 Specialist Officer पदांसाठी भरती जाहीर केली आहे. IT, Cyber Security, Data Science, Cloud Management आणि Risk Management क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. Online अर्ज 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू असून शेवटची तारीख 23 मार्च 2026 आहे. त्यामुळे जर तुम्ही Engineering किंवा Technology Background मधून असाल, तर हा article शेवटपर्यंत नक्की वाचा.

झटपट माहिती – CENTRAL BANK OF INDIA BHARTI 2026

तपशीलमाहिती
बँकेचे नावसेंट्रल बँक ऑफ इंडिया
पदांचा प्रकारस्पेशलिस्ट ऑफिसर्स
एकूण पदसंख्या275
ऑनलाईन अर्ज सुरू28/02/2026
अर्जाची अंतिम तारीख23/03/2026
ऑनलाईन परीक्षाएप्रिल 2026

Central Bank of India बद्दल थोडक्यात

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक आघाडीची Public Sector Bank असून तिची संपूर्ण भारतात 4500 हून अधिक शाखांचे जाळे आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ₹7,74,000 कोटींपेक्षा जास्त आहे आणि 34,000 हून अधिक कर्मचारी या बँकेत कार्यरत आहेत. या Central Central Bank of India Bharti 2026 मध्ये बँक विविध IT आणि Specialist क्षेत्रांसाठी अनुभवी व्यावसायिकांची निवड करत आहे.

पदाचे तपशील – CENTRAL BANK OF INDIA SPECIALIST OFFICER VACANCY

Central Bank of India Bharti 2026 यामध्ये एकूण 275 जागा आहेत. पदानुसार महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे:

पदएकूण जागा
सॉफ्टवेअर डेव्हलपर (Java)13
मोबाईल डेव्हलपर (Android/iOS)3
सॉफ्टवेअर डेव्हलपर (Dot Net)6
डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर11
डिजिटल चॅनेल मॅनेजर / डिजिटल ॲप्लिकेशन स्पेशालिस्ट23
Linux/ Solaris / SAN / Storage / SRE / OpenShift14
विंडोज / AD5
क्लाउड मॅनेजर5
इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी अँड आयटी गव्हर्नन्स, रिस्क38
नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर / नेटवर्क सिक्युरिटी5
प्रोडक्शन सपोर्ट / ROC / डिजिटल सपोर्ट26
एंटरप्राइझ / इंटिग्रेशन / पब्लिक क्लाउड आर्किटेक्ट6
DevSecOps4
वेब सर्व्हर / वेब लॉजिक ॲडमिनिस्ट्रेटर3
डेटा आर्किटेक्ट2
डेटा इंजिनिअर / डेटा क्वालिटी / ETL / PLSQL / BI15
डेटा सायंटिस्ट6
Gen AI2
IT ऑफिसर82
रिस्क मॅनेजर4
Taxation/CA2
एकूण जागा –275
  • SC – 41, ST – 20, OBC – 74, EWS – 27, UR – 113
  • (PwBD) – एकूण 11 आरक्षित जागा

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – CENTRAL BANK OF INDIA SO ELIGIBILITY

Central Bank of India Bharti 2026 मध्ये बहुतेक IT पदांसाठी शैक्षणिक पात्रता एकसमान आहे:

शिक्षण :

  • B.E. / B.Tech. – Computer Science / IT / Electronics / Electronics & Communications / Telecommunications
  • किंवा MCA
  • महत्त्वाचे – पदवी Full Time आणि Regular Course असणे आवश्यक. Distance Learning चालणार नाही.

अनुभव (Scale नुसार) :

Scaleपदकिमान अनुभव
Scale IJunior Level2 वर्षे Post Qualification
Scale IIManager4 वर्षे Post Qualification
Scale IIISenior Manager6 वर्षे Post Qualification
Scale IVChief Manager10 वर्षे Post Qualification
  • उदाहरणार्थ – Java Developer Scale I साठी किमान 2 वर्षांचा Java Development अनुभव हवा, त्यात Angular, React, Node, Spring Boot चाही अनुभव असणे अपेक्षित आहे.
  • Risk Manager (Scale III) – MBA / MMS Finance / Statistics – किमान 3 वर्षांचा Risk Management अनुभव.
  • Taxation/CA (Scale II) – ICAI Final Exam उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा – SPECIALIST OFFICER AGE LIMIT

Scaleकमाल वय
Scale I30 वर्षे
Scale II35 वर्षे
Scale III35 वर्षे
Scale IV45 वर्षे

वयात सूट –

  • SC/ST – 5 वर्षे
  • OBC – 3 वर्षे
  • PwBD – 10 वर्षे
  • 1984 दंगलीतील पीडितांचे कुटुंब – 5 वर्षे
  • Ex-Servicemen – 5 वर्षे

वेतनमान – CENTRAL BANK SO SALARY PER MONTH

Grade/ScaleBasic Pay
चीफ मॅनेजर (Scale IV)₹1,02,300 – ₹1,20,940
सीनियर मॅनेजर (Scale III)₹85,920 – ₹1,05,280
मॅनेजर (Scale II)₹64,820 – ₹93,960
असिस्टंट मॅनेजर (Scale I)₹48,480 – ₹85,920

यासोबत बँकेच्या नियमानुसार अन्य भत्ते आणि सुविधाही मिळतात.

महत्त्वाच्या तारखा – IMPORTANT DATES

तपशीलतारीख
Online अर्ज सुरू होण्याची तारीख28 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख23 मार्च 2026
परीक्षेची तारीखएप्रिल 2026 (Tentative)
Interview ची तारीखएप्रिल 2026 (Tentative)
Eligibility Cutoff Date31 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया – CENTRAL BANK OF INDIA SO SELECTION PROCESS 2026

Central Bank of India Bharti 2026 ची Online Written Examination + Interview या दोन टप्प्यांमध्ये निवड होईल.

Online परीक्षेची रचना:

विषयप्रश्नसंख्यागुणवेळ
Stream/Category Specific Questions5075६० मिनिटे
Reasoning1515३० मिनिटे
Banking, Economic & General Awareness1010
एकूण7510090 मिनिटे

महत्त्वाचे मुद्दे:

  • Negative Marking नाही – चुकीच्या उत्तरावर गुण कापले जाणार नाहीत.
  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी General/EWS – 50%, SC/ST/OBC/PwBD – 45% गुण आवश्यक.
  • Interview साठीही General/EWS – 50%, SC/ST/OBC/PwBD – 45% गुण हवेत.
  • Written : Interview गुणांचे प्रमाण – 70 : 30

⚠️ परीक्षा केंद्रे संपूर्ण भारतात उपलब्ध आहेत – महाराष्ट्रात मुंबई/नवी मुंबई/Thane, नागपूर, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी परीक्षा होणार आहे.

महत्वाच्या लिंक्स – IMPORTANT LINKS

लिंक नावURL
अप्लाय लिंकअप्लाय करा
PDF जाहिरातयेथे बघा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व भरती जाहिरातीयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

अर्ज कसा करावा? – CENTRAL BANK OF INDIA SO RECRUITMENT 2026 APPLICATION

Online अर्जाची लिंक – https://ibpsreg.ibps.in/cbisofeb26/

अर्ज करण्यापूर्वी तयार ठेवा :

  • Passport Size Color Photo (20KB – 50KB, JPEG)
  • Signature (10KB – 20KB, JPEG)
  • Left Thumb Impression (20KB – 50KB, JPEG)
  • Handwritten Declaration – English मध्ये (50KB – 100KB, JPEG)
  • Valid Email ID आणि Mobile Number
  • Online Payment साठी कार्ड किंवा Net Banking तपशील

Step-by-Step प्रक्रिया :

  1. बँकेच्या वेबसाईटवर जाऊन “Click Here to Apply Online” वर क्लिक करा.
  2. Basic माहिती भरा – Provisional Registration Number मिळेल.
  3. Photo, Signature, Thumb Impression आणि Handwritten Declaration Upload करा.
  4. Application Fee Online भरा.
  5. “Complete Registration” वर क्लिक करा.
  6. E-Receipt आणि Application Form Print करून ठेवा.

⚠️ सूचना – अर्ज Submit केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

अर्ज शुल्क – APPLICATION FEE

कॅटेगरीशुल्क
SC / ST / PwBD / महिला उमेदवार₹175/-
इतर सर्व उमेदवार₹850/-

⚠️शुल्क फक्त Online Payment द्वारे भरावे. Debit Card, Credit Card, Net Banking, UPI स्वीकारले जाते. शुल्क परत मिळणार नाही.

इतर महत्त्वाच्या अटी – OTHER IMPORTANT TERMS

  • निवड झालेल्या उमेदवाराला ₹3 लाखांचा Bond 3 वर्षांसाठी द्यावा लागेल.
  • Probation Period – 2 वर्षे
  • CIC (Credit Information Company) Score किमान 650 असणे आवश्यक. Credit Default असल्यास अपात्र ठरविले जाऊ शकते.
  • Posting प्रामुख्याने मुंबई/नवी मुंबई येथे असेल, तथापि बँकेच्या गरजेनुसार इतर ठिकाणी पण असू शकते.
  • Central Bank of India च्या विद्यमान कर्मचार्‍यांना अर्ज करण्यासाठी किमान 3 वर्षांची सेवा असणे आवश्यक आहे.
  • Nationality – भारतीय नागरिक, नेपाळ/भूतानचे प्रजाजन किंवा भारत सरकारने पात्रता प्रमाणपत्र दिलेले व्यक्ती.

निष्कर्ष – CONCLUSION

Central Bank of India Bharti 2026 ही IT आणि Specialist क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. 275 पदे, आकर्षक वेतन (₹48,480 ते ₹1,20,940) आणि सुरक्षित सरकारी करिअर यामुळे ही भरती विशेष ठरते. पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासून वेळेत अर्ज करावा आणि या संधीचा नक्की लाभ घ्यावा.

⚠️ DISCLAIMER – वरील सर्व माहिती Central Bank of India च्या अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF एकदा स्वतः वाचा आणि पात्रता नीट तपासा. जाहिरातीत भविष्यात बदल झाल्यास बँकेच्या वेबसाईटवर तपासा.