NPCIL Apprentice Bharti 2026 – मित्रांनो, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. NPCIL Apprentice Bharti 2026 मध्ये Apprentices Act, 1961 अंतर्गत तब्बल 245 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज सुरू झाले आहेत 26 फेब्रुवारी 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 18 मार्च 2026. खालील दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात वाचून पात्र उम्मेदवार अर्ज करू शकतात.
महत्त्वाची माहिती – NPCIL APPRENTICE BHARTI 2026
| संस्थेचे नाव | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) |
| विभाग | Department of Atomic Energy |
| पदाचे नाव | ट्रेड अप्रेंटिस |
| एकूण जागा | 245 |
| प्रशिक्षण कालावधी | 1 वर्ष |
| वयोमर्यादा | 18 ते 24 वर्षे |
| शैक्षणिक पात्रता | ITI उत्तीर्ण |
| अर्ज सुरू तारीख | 26 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 18 मार्च 2026 |
ट्रेडनिहाय रिक्त जागांचा तपशील – NPCIL RECRUITMENT 2026
| ट्रेड | एकूण |
|---|---|
| फिटर (Fitter) | 68 |
| इलेक्ट्रीशियन (Electrician) | 68 |
| इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic) | 68 |
| COPA (Prog. & Sys. Admin. Asst.) | 10 |
| टर्नर (Turner) | 10 |
| मशिनिस्ट (Machinist) | 10 |
| वेल्डर (Welder) | 11 |
| एकूण | 245 |
⚠️ एकूण 09 जागा PwBD (दिव्यांग) उमेदवारांसाठी क्षैतिज (horizontally) आरक्षित आहेत. COPA = Computer Operator and Programming Assistant.
पात्रता निकष (Eligibility Criteria)
NPCIL Apprentice Bharti 2026 साठी खालील पात्रता अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
- संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
- सर्व ट्रेडसाठी (Fitter, Electrician, Electronics Mechanic, COPA, Turner, Machinist, Welder) संबंधित ट्रेडचे ITI असणे आवश्यक
वयोमर्यादा (दि. 18/03/2026 रोजी)
| कॅटेगरी | वयोमर्यादा |
|---|---|
| सर्वसाधारण (UR/EWS) | 18 ते 24 वर्षे |
| SC/ST | 18 ते 29 वर्षे (+5 वर्षे सूट) |
| OBC (Non-Creamy Layer) | 18 ते 27 वर्षे (+3 वर्षे सूट) |
| PwBD – General/EWS | 18 ते 34 वर्षे (+10 वर्षे सूट) |
| PwBD – SC/ST | 18 ते 39 वर्षे (+15 वर्षे सूट) |
| PwBD – OBC (NCL) | 18 ते 37 वर्षे (+13 वर्षे सूट) |
अपात्रता
- जे उमेदवार आधीच Apprentices Act, 1961 अंतर्गत कोणत्याही सरकारी, PSU किंवा खाजगी संस्थेत Apprenticeship करत आहेत किंवा पूर्ण केली आहे ते अर्ज करण्यास पात्र नाहीत
- चुकीची माहिती, बनावट कागदपत्रे सादर केल्यास अर्ज तात्काळ रद्द होईल आणि NPCIL मधील Apprenticeship साठी कायमस्वरूपी बंदी
मासिक वेतन – NPCIL APPRENTICE SALARY
| तपशील | माहिती |
|---|---|
| मासिक वेतन | रु. 9,600/- |
| प्रशिक्षण कालावधी | 1 वर्ष (सर्व ट्रेडसाठी) |
| रोजगाराची हमी | नाही – प्रशिक्षण पूर्णानंतर NPCIL मध्ये नोकरी मिळण्याची कोणतीही बाध्यता नाही |
| NCVT प्रमाणपत्र | प्रशिक्षण पूर्ण करून NCVT परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर Trade Proficiency Certificate मिळेल |
| छात्रावास/वाहतूक | कोणतीही सुविधा उपलब्ध नाही – सर्व व्यवस्था उमेदवाराने स्वतः करायची आहे |
⚠️ नोंद – NPCIL Apprentice Bharti 2026 हे केवळ प्रशिक्षण आहे. Apprentices Act, 1961 नुसार प्रशिक्षणानंतर NPCIL मध्ये नोकरी देणे बंधनकारक नाही. तरीही हे NCVT प्रमाणपत्र भविष्यातील इतर सरकारी भरत्यांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते.
निवड प्रक्रिया – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
NPCIL Apprentice Bharti 2026 मध्ये निवड पूर्णपणे गुणवत्ता (Merit) आधारित आहे. कोणतीही लेखी परीक्षा नाही.
पायरी 1 – ITI गुण : उमेदवारांची Shortlist संबंधित ITI ट्रेडमध्ये मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित तयार केली जाईल
पायरी 2 – Tie-Breaker : समान टक्केवारी असल्यास: (i) जास्त वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य; (ii) जन्मतारीखही समान असल्यास 10वी/8वी (फक्त Welder साठी) मध्ये जास्त % असलेल्यास प्राधान्य
पायरी 3 – स्थानिक प्राधान्य : रावतभाटा राजस्थान साइटच्या 16 किमी परिसरात राहणाऱ्या पात्र स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
पायरी 4 – कागदपत्र पडताळणी : Shortlisted उमेदवारांची कागदपत्रे सत्यापन; यावेळी Medical Fitness Certificate (सरकारी नोंदणीकृत डॉक्टरकडून) सादर करावे
शारीरिक तंदुरुस्तीचे मापदंड – PHYSICAL STANDARDS
| मापदंड | आवश्यकता |
|---|---|
| उंची (Height) | 137 सेमी व अधिक |
| वजन (Weight) | 25.4 किलोग्राम व अधिक |
| छाती विस्तार (Chest Expansion) | किमान 3.8 सेमी (छातीच्या आकाराशिवाय) |
| दृष्टी (Vision) | कोणत्याही डोळ्यात किंवा पापण्यांमध्ये गंभीर विकृती नसावी |
| सांसर्गिक आजार | TB (सक्रिय किंवा बरे झालेले) व सांसर्गिक रोगमुक्त असणे आवश्यक |
महतावच्या लिंक्स – IMPORTANT LINKS
| लिंक नाव | URL |
|---|---|
| अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| PDF जाहिरात | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| सर्व भरती जाहिराती | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा? – NPCIL APPRENTICESHIP APPLY ONLINE
NPCIL Apprentice Bharti 2026 साठी अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांत आहे. दोन्ही टप्पे पूर्ण केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
टप्पा 1] NAPS 2.0 पोर्टल नोंदणी : प्रथम https://www.apprenticeshipindia.gov.in या Ministry of Skill Development & Entrepreneurship च्या NAPS 2.0 पोर्टलवर Candidate म्हणून नोंदणी करा. बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे अनिवार्य.
टप्पा 2] NPCIL वेबसाइटवर अर्ज : www.npcilcareers.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा. अर्ज उपलब्ध : 26/02/2026 (सकाळी 10:00) ते 18.03.2026 (सायं. 4:00)
टप्पा 3] Establishment ID : रावतभाटा राजस्थान साइटची Establishment Registration No. E08160800007 वापरून NAPS 2.0 पोर्टलवर देखील अर्ज करणे बंधनकारक. हे न केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
टप्पा 4] फोटो व स्वाक्षरी : फोटो: JPEG, 10-50 KB, 180×240 ते 480×640 pixels. स्वाक्षरी: JPEG, max 20 KB, 80×100 ते 160×560 pixels.
टप्पा 5] एकापेक्षा जास्त ट्रेड : एकापेक्षा जास्त ट्रेडसाठी पात्र असल्यास प्रत्येक ट्रेडसाठी स्वतंत्र अर्ज द्यावा. अंतिम ट्रेड NPCIL च्या गरजेनुसार ठरवला जाईल.
कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे – REQUIRED DOCUMENTS
- ऑनलाईन अर्जाचे प्रिंटआउट (हस्ताक्षरित)
- हालीची पासपोर्ट साईज फोटो (2 copies)
- जन्म दाखला / 10वी मार्कशीट (DOB पुरावा)
- 10वी आणि 12वी मार्कशीट
- ITI प्रमाणपत्र आणि सर्व Semester/Year मार्कशीट
- SC/ST/OBC (NCL) जात प्रमाणपत्र – भारत सरकारच्या विहित नमुन्यात
- EWS प्रमाणपत्र – वर्ष 2025-26 साठी वैध (Financial Year 2024-25 आधारित)
- PwBD (दिव्यांग) प्रमाणपत्र – लागू असल्यास (किमान 40% अपंगत्व)
- Medical Fitness Certificate – सरकारी नोंदणीकृत डॉक्टरकडून
- Police Verification Certificate – (NPCIL अत्यंत संरक्षित क्षेत्र असल्याने अनिवार्य)
- चारित्र्य/आचरण प्रमाणपत्र – संबंधित संस्थेकडून
- Domicile Certificate – (रावतभाटाच्या 16 किमी परिसरातील उमेदवारांसाठी)
- PAN Card, Aadhaar Card, बँक खाते तपशील
- Transgender ओळख प्रमाणपत्र – लागू असल्यास
- NAPS 2.0 नोंदणी क्रमांक
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ
Q1] NPCIL Apprentice Bharti 2026 साठी लेखी परीक्षा आहे का?
उत्तर : नाही. निवड पूर्णपणे ITI ट्रेडमधील गुणांच्या टक्केवारीवर आधारित Merit List नुसार होते. त्यानंतर Document Verification केले जाते.
Q2.] प्रशिक्षणानंतर NPCIL मध्ये नोकरी मिळेल का?
उत्तर : Apprentices Act, 1961 नुसार प्रशिक्षणानंतर NPCIL मध्ये नोकरी देणे बंधनकारक नाही. मात्र NCVT Trade Proficiency Certificate मिळते जे इतर सरकारी भरत्यांसाठी खूप उपयुक्त ठरते.
Q3] एका ट्रेडपेक्षा जास्त ट्रेडसाठी अर्ज करता येतो का?
उत्तर : होय, परंतु प्रत्येक ट्रेडसाठी स्वतंत्र अर्ज द्यावा लागेल. एकाच लिफाफ्यात किंवा एकाच अर्जात दोन ट्रेड नमूद केल्यास अर्ज बाद होईल. अंतिम ट्रेड NPCIL च्या गरजेनुसार ठरेल.
Q4] NAPS 2.0 नोंदणी का आवश्यक आहे?
उत्तर : NAPS 2.0 (National Apprenticeship Promotion Scheme 2.0) वर नोंदणी केल्याशिवाय NPCIL च्या वेबसाइटवर अर्ज स्वीकारला जाणार नाही. दोन्ही ठिकाणी अर्ज करणे अनिवार्य आहे.
Q5] आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यास काय होईल?
उत्तर : NPCIL च्या अधिसूचनेनुसार बँक खाते आधार क्रमांकाशी (Seeded) लिंक असणे अनिवार्य आहे. लिंक नसल्यास विद्यावेतन (Stipend) मिळण्यात अडचण येऊ शकते.
Q6] महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?
उत्तर : होय, अगदी. NPCIL लिंगसमतोल कार्यबल तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी विशेषतः प्रोत्साहन दिले आहे.
निष्कर्ष – CONCLUSION
NPCIL Apprentice Bharti 2026 ही ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक अत्यंत प्रतिष्ठित संधी आहे. भारतातील अणुऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठ्या सार्वजनिक उपक्रमात प्रशिक्षण घेणे म्हणजे केवळ रु. 9,600/ विद्यावेतन नाही, तर जागतिक दर्जाच्या Nuclear Technology च्या वातावरणात काम करण्याचा अनुभव आणि NCVT Trade Certificate मिळवण्याची संधी आहे. तुम्ही ITI उत्तीर्ण असाल तर आजच अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करा.
| ⚠️ Disclaimer (अस्वीकरण) – या लेखातील सर्व माहिती NPCIL, Rawatbhata Rajasthan Site यांनी दि. 26/02/2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेवर (Advertisement No. RR Site/HRM/Apprentice/01/2026) आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण अधिसूचना स्वतः वाचावी. |