MPSC Medical Officer Bharti 2026 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय अधिकारी भरती!

MPSC Medical Officer Bharti 2026 – मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एक महत्त्वाची भरती जाहीर केली आहे. MPSC Medical Officer Bharti 2026 अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये एकूण 297 वैद्यकीय अधिकारी (गट-ब) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली या जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून अंतिम तारीख 09 एप्रिल 2026 आहे. त्यामुळे वेळ न घालवता सर्व माहिती नीट वाचा आणि तुमचा अर्ज वेळेत सादर करा.

झटपट माहिती – MPSC MEDICAL OFFICER BHARTI 2026

तपशीलमाहिती
संस्थेचे नावमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, गट-ब
एकूण जागा297
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र (शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये)
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरू तारीख20 मार्च 2026
अर्ज अंतिम तारीख09 एप्रिल 2026

रिक्त जागांचा तपशील MPSC RECRUITMENT 2026

MPSC Medical Officer Bharti 2026 मध्ये एकूण 297 जागा उपलब्ध आहेत. सामाजिक आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

प्रवर्गएकूण
(SC)37
अ.ज. (ST)20
वि.जा. (अ) + भ.ज. (ब,क,ड)24
वि. मा. प्र.10
सा.आणि शै.मा.व.30
आ.दु.घ. (EWS)30
इ.मा.व. (OBC)54
अराखीव (खुला)92
एकूण जागा297

📌 विशेष – दिव्यांगांसाठी 12 जागा आणि अनाथांसाठी 03 जागा आरक्षित आहेत.

पात्रता निकष MPSC MEDICAL OFFICER QUALIFICATION

🎓 शैक्षणिक पात्रता

  • MBBS Degree (कोणत्याही Statutory University मधून) किंवा National Medical Commission Act 2019 अंतर्गत मान्यताप्राप्त समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम 1965 अंतर्गत नाव नोंदणी (Registration) असणे बंधनकारक आहे.
  • MBBS Internship Completion Certificate आवश्यक.

📅 वयोमर्यादा (01 जुलै 2026 रोजी)

श्रेणीकिमान वयकमाल वय
अराखीव (खुला)19 वर्षे38 वर्षे
मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ19 वर्षे43 वर्षे
प्राविण्यप्राप्त खेळाडू (अराखीव)19 वर्षे43 वर्षे
दिव्यांग उमेदवार19 वर्षे45 वर्षे
माजी सैनिक19 वर्षेसैनिकी सेवा + 3 वर्षे

वेतन MPSC MEDICAL OFFICER SALARY

MPSC Medical Officer Bharti 2026 मधील निवडलेल्या उमेदवारांना खालील वेतन मिळेल:

Pay Scaleतपशील
वेतनश्रेणीS-20
किमान वेतन₹56,100/-
कमाल वेतन₹1,77,500/-
इतर भत्तेनियमानुसार सर्व भत्ते (HRA, DA इ.)

निवड प्रक्रिया – MPSC MEDICAL OFFICER SELECTION PROCESS

या MPSC Medical Officer Bharti 2026 साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविली जाईल:

  1. चाळणी परीक्षा (Screening Test) – जर अर्जांची संख्या अधिक असेल तर ऑनलाईन/ऑफलाईन चाळणी परीक्षा घेतली जाऊ शकते. या परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम आणि स्वरूप नंतर MPSC संकेतस्थळावर जाहीर होईल.
  2. मुलाखत (Interview) – चाळणी परीक्षा झाल्यास चाळणी + मुलाखत गुण एकत्रित विचारात घेतले जातील. चाळणी न झाल्यास केवळ मुलाखत गुणांवर शिफारस केली जाईल.
  3. मुलाखतीत किमान 41% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
  4. Document Verification – निवड झाल्यानंतर सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स – IMPORTANT LINKS

लिंक नावURL
अप्लाय लिंकअप्लाय करा
PDF जाहिरातयेथे बघा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा IMPORTANT DATES

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू तारीख20 मार्च 2026
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख09 एप्रिल 2026
SBI Challan घेण्याची अंतिम तारीख11 एप्रिल 2026
Challan द्वारे बँकेत शुल्क भरण्याची अंतिम तारीख13 एप्रिल 2026 (बँक कार्यालयीन वेळेत)

अर्ज कसा करावा? – महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय अधिकारी (गट-ब) भरती

MPSC Medical Officer Bharti 2026 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. खालील steps follow करा:

  1. सर्वप्रथम https://mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  2. आधी Registration केले नसल्यास नवीन खाते (Profile) तयार करा.
  3. KYC प्रक्रिया MPSC ने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार पूर्ण करा — हे अनिवार्य आहे.
  4. MBBS Certificate, Maharashtra Medical Council Registration, Internship Certificate यासह सर्व आवश्यक कागदपत्रे PDF format मध्ये (50KB ते 500KB) तयार ठेवा.
  5. जाहिरात क्रमांक 009/2026 शोधा आणि ‘Check Eligibility’ करून अर्ज सुरू करा.
  6. सर्व माहिती अचूकपणे भरा आणि कागदपत्रे upload करा.
  7. ‘Submit and Pay Fees’ वर click करून शुल्क भरा.
  8. Payment successful झाल्यावर receipt download करा व जपून ठेवा.

अर्ज शुल्क – APPLICATION FEE

श्रेणीशुल्क (रुपये)
अराखीव (खुला / General)₹394/-
मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अनाथ / दिव्यांग₹294/-
बँक चार्जेसअतिरिक्त (लागू कर सह)
परतावाशुल्क परत मिळणार नाही (Non-refundable)

शुल्क भरण्याचे मार्ग – Credit Card, Debit Card, Net Banking किंवा SBI Challan (ऑफलाईन).

➡️ हे पण वाचा – EIL मध्ये 59 मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती सुरू!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न – (FAQ)

प्रश्न 1] MPSC Medical Officer Bharti 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
उत्तर : एकूण 297 जागा असून त्यात सर्व सामाजिक प्रवर्ग, महिला, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथांसाठी आरक्षण आहे.

प्रश्न 2] अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 09 एप्रिल 2026 (रात्री 23:59) आहे.

प्रश्न 3] शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: MBBS Degree आणि Maharashtra Medical Council कडे नोंदणी अनिवार्य आहे.

प्रश्न 4] वेतन किती मिळेल?
उत्तर :
S-20 वेतनश्रेणी अंतर्गत ₹56,100/- ते ₹1,77,500/- व नियमानुसार भत्ते.

प्रश्न 5] निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर :
अर्जांची संख्या जास्त असल्यास चाळणी परीक्षा घेतली जाईल, त्यानंतर मुलाखत (किमान 41% गुण अनिवार्य) आणि Document Verification होईल.

निष्कर्ष – CONCLUSION

मित्रांनो, MPSC Medical Officer Bharti 2026 ही सरकारी क्षेत्रात स्थिर करियर घडविण्याची एक चांगली संधी आहे. 297 जागांसाठी competition असेल, पण तयारी व्यवस्थित असेल तर यश नक्कीच मिळेल. अर्जाची अंतिम तारीख 09 एप्रिल 2026 असल्याने उशीर न करता आजच तुमचा अर्ज तयार करायला सुरुवात करा!

⚠️ Disclaimer – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF advertisement आणि वेबसाइट तपासा. कोणत्याही बदलासाठी MPSC चे अधिकृत संकेतस्थळ हेच अंतिम संदर्भ मानावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top