पूर्व रेल्वेच्या रेल्वे भरती विभागाकडून 3115 अॅक्ट अप्रेंटिस पदांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून ही भरती अॅक्ट अप्रेंटिस कायदा 1961 आणि अप्रेंटिसशिप नियम 1992 अंतर्गत पार पडणार आहे. या भरतीसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया व इतर महत्त्वाच्या बाबींबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

• अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
• नोकरी ठिकाण: पूर्व रेल्वे
• एकूण पदसंख्या: 3115
• पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
• महत्त्वाच्या तारखा:
अधिसूचना प्रसिद्धीची तारीख | 31 जुलै 2025 |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 13 सप्टेंबर 2025 |
शैक्षणिक पात्रता: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराकडे खालील शैक्षणिक अहर्ता असणे आवश्यक आहे.
- 10वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह) – मान्यताप्राप्त मंडळामधून.
- ITI प्रमाणपत्र – संबंधित ट्रेडमध्ये, NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त संस्थेमधून.
• वयोमर्यादा: किमान वयोमर्यादा – 15 वर्षे, जास्तीत जास्त वयोमर्यादा – 24 वर्षे
⚠️ विशेष बाब – अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), दिव्यांग (PwD) आणि माजी सैनिक (Ex-Servicemen) यांसारख्या विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये शासकीय नियमानुसार सवलत दिली जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
• अर्ज शुल्क:
सर्वसाधारण, OBC आणि EWS प्रवर्ग: ₹100/-
SC / ST / PWD / ESM (माजी सैनिक) प्रवर्ग: शुल्क माफ (फी नाही)
उमेदवारांनी त्यांचे शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावे:
Debit Card
Credit Card
Net Banking
UPI
• निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड 10वी आणि ITI परीक्षेतील टक्केवारीच्या सरासरीवर आधारित मेरिट लिस्टवर केली जाईल.या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही.
• टीप: अर्ज करताना दिलेली शैक्षणिक माहिती आणि गुण अचूक भरावेत, कारण त्यावरच निवड प्रक्रिया अवलंबून आहे.एकदा अर्ज सादर केल्यावर कोणतीही दुरुस्ती किंवा बदल मान्य केला जाणार नाही.