बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून जनरलिस्ट ऑफिसर (स्केल-II) या पदासाठी एकूण 500 जागांची भरती होणार आहे. ही भरती योग्य शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांसाठी असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावा.

🟥 भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र (BOM).
🟥 भरती प्रकार : केंद्र सरकार च्या वतीने हे भरती राबविण्यात येत आहे.
🟥अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
🟥 एकूण पद : या भरती मध्ये एकूण 500 पद आहे.
🟥 पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर (स्केल-II).
🟥 वेतनश्रेणी : मूलभूत वेतन ₹64,820 पासून सुरू होऊन वार्षिक वाढींसह ₹93,960 पर्यंत जाईल.या व्यतिरिक्त महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) किंवा निवास लीज सुविधा, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा तसेच इतर शासकीय नियमांनुसार भत्ते मिळणार असून, एकूण मासिक पगाराचा आकडा लक्षणीय प्रमाणात वाढतो.यामुळे ही नोकरी आर्थिकदृष्ट्या तसेच करिअरच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर ठरते.
🟥 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (महाराष्ट्र).
शैक्षणिक पात्रता :
🔹मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत किमान 60% गुणांसह पदवी (SC/ST/OBC/PwBD उमेदवारांसाठी किमान 55% गुण).
🔹किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA) / कास्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) / चार्टर्ड फायनान्शिअल अॅनालिस्ट (CFA) / ICWA यापैकी कोणतीही व्यावसायिक पात्रता.
🔹पदवी ही पूर्णवेळ (Full Time) पद्धतीने घेतलेली असावी.
🔹बँकिंग, वित्तीय संस्था किंवा संबंधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा :
किमान वय | 22 वर्षे |
कमाल वय | 35 वर्षे |
वयोमर्यादा सवलत (Age Relaxation) :
⚫ SC / ST: 5 वर्षे
⚫ OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे
⚫ PwBD (Persons with Benchmark Disabilities): सामान्य प्रवर्ग: 10 वर्षे, OBC: 13 वर्षे, SC / ST: 15 वर्षे.
⚫ माजी सैनिक (Ex-Servicemen): सरकारी नियमांनुसार सेवा कालावधीवर आधारित सवलत
⚫ जमाव सेवेत काम करणारे कर्मचारी: बँकेच्या अंतर्गत धोरणानुसार सवलत
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 ऑगस्ट 2025 |

अर्ज फी :
सामान्य (UR) / EWS / OBC | ₹1,180/- (₹1,000 + GST ₹180) |
SC / ST / PwBD | 118/- (₹100 + GST ₹18) |
माजी सैनिक (Ex-Servicemen) | शुल्क सवलत सरकारी नियमांनुसार लागू |
⚫ अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने (डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI) भरावे लागेल, आणि शुल्क एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही.
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होईल –
1️⃣ ऑनलाइन परीक्षा (एकूण 150 गुण) English Language: 20 प्रश्न – 20 मिनिटे, Quantitative Aptitude: 20 प्रश्न – 20 मिनिटे, Reasoning Ability: 20 प्रश्न – 20 मिनिटे, Professional Knowledge: 90 प्रश्न – 60 मिनिटे एकूण वेळ: 2 तास, निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
2️⃣ मुलाखत (Interview)ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड 75:25 या गुणोत्तराने (ऑनलाइन परीक्षा: मुलाखत) केली जाईल.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची प्रक्रिया : बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 – अर्ज करण्याची प्रक्रिया
1️⃣ अधिकृत संकेतस्थळावर जा: bankofmaharashtra.in
2️⃣ वरच्या मेनू मधील “Careers” किंवा “Current Openings” या विभागावर क्लिक करा.
3️⃣ संबंधित भरतीची जाहिरात उघडा व पात्रता, अटी, सूचना काळजीपूर्वक वाचा.
4️⃣ “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
5️⃣ नवीन नोंदणी (Registration) करा – नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर टाकून.
6️⃣ Login करून अर्ज फॉर्म पूर्ण भरा – वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, अनुभव इत्यादी.
7️⃣ फोटो व स्वाक्षरी अपलोड करा (निर्दिष्ट साइज व फॉरमॅटमध्ये).
8️⃣ अर्ज शुल्क ऑनलाइन भरा – डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे.
9️⃣ अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट काढून ठेवा भविष्यातील संदर्भासाठी.
- पुणे महानगरपालिका भरती 2025 | PUNE MAHANAGARPALIKA BHARTI 2025 |
- महाराष्ट्र शासन – भूमि अभिलेख विभाग भरती 2025 | BHUMI ABHILEKH BHARTI 2025 |
- आरआरबी एनटीपीसी भरती 2025 – एकूण 8875 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | RRB NTPC RECRUITMENT 2025
- नागपूर महानगरपालिका भरती 2025: 174 पदांच्या सुवर्ण संधी – संपूर्ण माहिती आणि अर्जाची पद्धत
- मध्य रेल्वे अपरेंटिस भरती 2025 | Central Railway Apprentice 2418 पदांसाठी अर्ज सुरू