मोठी बातमी: नागपूर महानगरपालिकेत 174 पदांची भरती! नागपूर शहरातील job seekers साठी एक उत्तम संधी आली आहे! नागपूर महानगरपालिकेने गट-क सेवेतील 174 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. हे सर्व पद सरळसेवेने (थेट भरती) भरले जाणार आहेत.
महत्वाचे दिनांक
क्रमांक | तपशील | दिनांक |
---|---|---|
1 | Online अर्ज सुरुवात | 26 ऑगस्ट 2025 |
2 | अर्जाची अंतिम तारीख | 09 सप्टेंबर 2025 |
3 | फी भरण्याची शेवटची तारीख | 09 सप्टेंबर 2025 |
4 | प्रवेशपत्र उपलब्ध | लवकरच जाहीर होईल |
⚠️ सावधान: हे सर्व दिनांक बदलू शकतात. नियमित https://nmcnagpur.gov.in वर तपासत रहा!
पदांचा तपशील आणि वेतनश्रेणी
पदनाम | पदसंख्या | वेतनश्रेणी (महिना) |
---|---|---|
कनिष्ठ लिपिक | 60 | ₹19,900 – 63,200 |
कर संग्राहक | 74 | ₹19,900 – 63,200 |
स्टेनोग्राफर | 10 | ₹38,600 – 1,22,800 |
लेखापाल / रोखपाल | 10 | ₹35,400 – 1,12,400 |
ग्रंथालय सहाय्यक | 8 | ₹19,900 – 63,200 |
विधी सहाय्यक | 6 | ₹38,600 – 1,22,800 |
प्रोग्रॅमर | 2 | ₹25,500 – 81,100 |
हार्डवेअर इंजिनियर | 2 | ₹38,600 – 1,22,800 |
सिस्टम अनॅलिस्ट | 1 | ₹38,600 – 1,22,800 |
डेटा मॅनेजर | 1 | ₹38,600 – 1,22,800 |
एकूण: | 174 पदे |
शैक्षणिक पात्रता
⚫ कनिष्ठ लिपिक
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
– मराठी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र ३० शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र ४० शब्द प्रती मिनिट वेग.
– संगणक अर्हतादर्शक शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हता.
⚫ कर संग्राहक
– कोणत्याही शाखेचे पदवीधर.
– मराठी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र ३० शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र ४० शब्द प्रती मिनिट.
– संगणक अर्हतादर्शक शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हता.
⚫ स्टेनोग्राफर
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
– मराठी व इंग्रजी लघुलेखन ८० शब्द प्रती मिनिट परीक्षा उत्तीर्ण.
– संगणक अर्हतादर्शक शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हता.
– शासकीय / निमशासकीय कार्यालयात स्टेनोग्राफर पदाचा ३ वर्षांचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य.
⚫ लेखापाल / रोखपाल
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
– भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकल फंड ऑडिट मॅन्युअल (C.F.M.P) परीक्षा उत्तीर्ण. किंवा L.G.S.D परीक्षा उत्तीर्ण व अनुभवासह.
– शासकीय / निमशासकीय / स्वायत्त संस्थांमध्ये लिपिक (लेखा) पदावर किमान ५ वर्षांचा अनुभव.
⚫ ग्रंथालय सहाय्यक
– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C).
– ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स.
⚫ विधी सहाय्यक
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
– शासकीय / निमशासकीय / स्वायत्त संस्थांमध्ये न्यायविषयक कामाशी संबंधित पदावर किमान पाच वर्षांचा न्यायालयीन अनुभव.
⚫ प्रोग्रामर
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका (Diploma).
– System Analysis / Programming / Software Development मध्ये १ वर्षांचा अनुभव.
– महापालिकेमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत उमेदवारांना प्राधान्य.
⚫ हार्डवेअर इंजिनिअर
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE मान्यताप्राप्त पदवी (B.E. Computer) व संगणक देखभाल व दुरुस्तीचा ३ वर्षांचा अनुभव.किंवामान्यताप्राप्त विद्यापीठाची Computer Hardware मधील पदविका व ५ वर्षांचा अनुभव.
– महापालिकेमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत उमेदवारांना प्राधान्य.
⚫ सिस्टम अनॅलिस्ट
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE मान्यताप्राप्त पदवी (B.E. Computer).
– System Analysis / Programming / Software Development मध्ये ३ वर्षांचा अनुभव.
– महापालिकेमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत उमेदवारांना प्राधान्य.
⚫ डेटा मॅनेजर
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE मान्यताप्राप्त पदवी (B.E. Computer).
– System Analysis / Programming / Software Development मध्ये ३ वर्षांचा अनुभव.
– महापालिकेमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत उमेदवारांना प्राधान्य.
वयोमर्यादा
श्रेणी | किमान वय | जास्तीत जास्त वय |
---|---|---|
सर्वसाधारण | 18 वर्षे | 38 वर्षे |
मागासवर्गीय | 18 वर्षे | 43 वर्षे |
माजी सैनिक | 18 वर्षे | 55 वर्षे |
वयोमर्यादा गणन्याचा दिनांक: 09 सप्टेंबर 2025
परीक्षेची माहिती
⚫ परीक्षा पद्धत
– ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test)
– वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न
– 100 प्रश्न = 200 गुण
– वेळ: 2 तास
⚫ परीक्षा विषय
🔹अतांत्रिक पदांसाठी (कनिष्ठ लिपिक, कर संग्राहक इ.):
– मराठी: 25 प्रश्न
– इंग्रजी: 25 प्रश्न
– बौद्धिक चाचणी: 25 प्रश्न
– सामान्य ज्ञान: 25 प्रश्न
🔹तांत्रिक पदांसाठी:
– मराठी: 15 प्रश्न
– इंग्रजी: 15 प्रश्न
– बौद्धिक चाचणी: 15 प्रश्न
– सामान्य ज्ञान: 15 प्रश्न
– तांत्रिक विषय: 40 प्रश्न
परीक्षा फी
श्रेणी | फी |
---|---|
सर्वसाधारण | ₹1,000 |
मागासवर्गीय / EWS / अनाथ | ₹900 |
माजी सैनिक | विनामूल्य |
महत्त्वाचे: फी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येईल (Credit Card / Debit Card / UPI / Net Banking)
निवड प्रक्रिया
1️⃣ ऑनलाइन अर्ज (26 ऑगस्ट – 09 सप्टेंबर 2025)
2️⃣ प्रवेशपत्र डाउनलोड (जाहीर होईल)
3️⃣ ऑनलाइन परीक्षा (तारीख जाहीर होईल)
4️⃣ निकाल प्रसिद्धी
5️⃣ कागदपत्रे तपासणी
6️⃣ अंतिम निवड
पास मार्क्स
– सर्वसाधारण: 50%
– मागासवर्गीय: 45%
अर्ज करण्याची प्रक्रिया
स्टेप 1: https://nmcnagpur.gov.in वर जा.
स्टेप 2: “New User Registration” वर क्लिक करा.
स्टेप 3: मोबाइल नंबर आणि Email ID सत्यापित करा.
स्टेप 4: Login ID आणि Password मिळवा.
स्टेप 5: अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6: फी भरा.
स्टेप 7: अर्जाची प्रत डाउनलोड करा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे
⚫अपलोड करण्यासाठी आवश्यक
– अधिवास प्रमाणपत्र
– शैक्षणिक प्रमाणपत्रे
– जन्म प्रमाणपत्र
– जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
– अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
– संगणक प्रमाणपत्र
– छायाचित्र (JPEG format, 100KB-2MB)
मदतीसाठी संपर्क
⚫Help Desk: 9513252088 (TCS)
⚫ NMC Helpline: 9175414880
⚫ वेळ: सोमवार ते शुक्रवार, 10:00 ते 18:00
⚫Website: https://nmcnagpur.gov.in