मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 | एकूण जागा – 2331 | BOMBAY HIGH COURT RECRUITMENT 2025

December 10, 2025 by

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेत क्लर्क, स्टेनोग्राफर, वाहनचालक आणि शिपाई या पदांसाठी एकूण 2331 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही संधी मुख्यालय मुंबई, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ यांच्या आस्थापनेवर आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2026 आहे. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



▪️भरती विभाग – मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court)
▪️भरती प्रकार – ही भरती राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) द्वारे राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️पदाचे नाव – क्लर्क / स्टेनोग्राफर / वाहनचालक / शिपाई
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 2331 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – मुंबई, नागपूर आणि छत्रपती सांभाजीनगर

पदाचे तपशील (Post Details)

1. क्लर्क (Clerk) – 1332 पदे

मुंबई830
नागपूर166
छत्रपती सांभाजीनगर336

2. स्टेनोग्राफर (हायर ग्रेड) – 19 पदे

मुंबई9
नागपूर2
छत्रपती सांभाजीनगर8

3. स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) – 56 पदे

मुंबई44
नागपूर4
छत्रपती सांभाजीनगर8

4. वाहनचालक (Staff Car Driver) – 37 पदे

मुंबई26
नागपूर5
छत्रपती सांभाजीनगर6

5. शिपाई/हमाल/फराश (Peon) – 887 पदे

मुंबई570
नागपूर115
छत्रपती सांभाजीनगर202

शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)

1] क्लर्क –

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • इंग्रजी टायपिंग 40 w.p.m. किंवा त्याहून अधिक
  • संगणक प्रमाणपत्र आवश्यक


2] स्टेनोग्राफर (हायर ग्रेड) –

  • विद्यापीठ पदवी (5 वर्षांचा अनुभव असल्यास सूट)
  • इंग्रजी शॉर्टहँड 100 w.p.m. किंवा त्याहून अधिक
  • इंग्रजी टायपिंग 40 w.p.m. किंवा त्याहून अधिक
  • संगणक प्रमाणपत्र आवश्यक


3] स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) –

  • विद्यापीठ पदवी (3 वर्षांचा अनुभव असल्यास सूट)
  • इंग्रजी शॉर्टहँड 80 w.p.m. किंवा त्याहून अधिक
  • इंग्रजी टायपिंग 40 w.p.m. किंवा त्याहून अधिक
  • संगणक प्रमाणपत्र आवश्यक


4] वाहनचालक –

  • एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम परीक्षा
  • वैध हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना (LMV)
  • किमान 3 वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव
  • मराठी व हिंदी भाषा माहिती आवश्यक


5] शिपाई/हमाल/फराश – किमान सातवी उत्तीर्ण


▪️इतर पात्रता –

  • उमेदवार भारताचा नागरिक आणि महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा
  • चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी
  • 28 मार्च 2005 नंतर जन्मलेल्या दोनापेक्षा जास्त मुले नसावीत
  • फौजदारी प्रकरण प्रलंबित नसावे
  • मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक


वेतनश्रेणी (PAY SCALE)

पदाचे नाववेतन
क्लर्कवेतनश्रेणी S-10
₹29,200 – ₹92,300 + भत्ते
स्टेनोग्राफर (हायर ग्रेड)वेतनश्रेणी S-20
₹56,100 – ₹1,77,500 + भत्ते
स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड)वेतनश्रेणी S-18
₹49,100 – ₹1,55,800 + भत्ते
वाहनचालकवेतनश्रेणी S-10
₹29,200 – ₹92,300 + भत्ते
शिपाई/हमाल/फराशवेतनश्रेणी S-3
₹16,600 – ₹52,400 + भत्ते

वयोमर्यादा (Age Limit)

पदाचे नावखुला प्रवर्गआरक्षित प्रवर्ग
क्लर्क18-38 वर्षे18-43 वर्षे
स्टेनोग्राफर21-38 वर्षे21-43 वर्षे
वाहनचालक21-38 वर्षे21-43 वर्षे
शिपाई18-38 वर्षे18-43 वर्षे

आरक्षित प्रवर्ग – महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्ग



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरू होण्याची तारीख15 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 जानेवारी 2026

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अर्ज करण्याची लिंकCOMING SOON
अधिकृत PDF जाहिरात 1
[ क्लर्क ]
येथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात 2
[ स्टेनोग्राफर हायर ग्रेड ]
येथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात 3
[ स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ]
येथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात 4
[ वाहनचालक ]
येथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात 5
[ शिपाई ]
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

निवड प्रक्रिया (Selection Process)

1] क्लर्क पदासाठी –

  1. स्क्रीनिंग टेस्ट (90 गुण) – उत्तीर्ण गुण : 45
    • मराठी – 10 गुण
    • इंग्रजी – 20 गुण
    • सामान्य ज्ञान – 10 गुण
    • बौद्धिक क्षमता – 20 गुण
    • अंकगणित – 20 गुण
    • संगणक – 10 गुण
  2. टायपिंग टेस्ट (20 गुण) – उत्तीर्ण गुण : 10
    • 400 शब्द, 10 मिनिटे
  3. मुलाखत (40 गुण)


2] स्टेनोग्राफर पदासाठी –

  1. शॉर्टहँड टेस्ट (40 गुण)
    • हायर ग्रेड – 500 शब्द, 5 मिनिटात लिहावे, 30 मिनिटात टंकन
    • लोअर ग्रेड – 400 शब्द, 5 मिनिटात लिहावे, 25 मिनिटात टंकन
  2. टायपिंग टेस्ट (40 गुण)
  3. मुलाखत (20 गुण)


3] वाहनचालक पदासाठी –

  1. लेखी परीक्षा (20 गुण) – वाहन देखभाल, रस्ते माहिती, सामान्य ज्ञान
  2. पूर्वानुभव (10 गुण)
  3. मोटार वाहन परीक्षा (10 गुण)
  4. मुलाखत (10 गुण)

एकूण गुण – 50 (उत्तीर्ण गुण : 25)

4] शिपाई पदासाठी –

  1. लेखी परीक्षा (30 गुण) – वस्तुनिष्ठ प्रश्न
  2. शारीरिक क्षमता व विशेष अर्हता (10 गुण)
  3. मुलाखत (10 गुण)


अर्ज प्रक्रिया (How to Apply)

1] SBI Collect द्वारे ₹1000/- परीक्षा शुल्क भरा
2] https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर जा
3] ‘Recruitment’ विभागात जाऊन संबंधित पदासाठी ‘Apply Online’ वर क्लिक करा
4] SBI Collect Reference Number अचूक भरा
5] सर्व माहिती अचूक भरा:

  • वैयक्तिक माहिती
  • शैक्षणिक तपशील
  • फोटो व स्वाक्षरी अपलोड करा (40 KB पेक्षा कमी, JPG/JPEG format)
  • पत्ता, ईमेल व मोबाईल नंबर


6] Declaration वाचून “I Agree” वर क्लिक करा आणि Submit करा
7] Registration ID Number नोंद करा व प्रिंटआउट काढून ठेवा

⚠️ महत्वाचे निर्देश –

  • फक्त एकाच आस्थापनेची निवड करा (मुंबई/नागपूर/औरंगाबाद)
  • एकदा सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाहीत
  • नियुक्तीनंतर 5 वर्षे बदलीसाठी अर्ज करता येणार नाही
  • एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास फक्त शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल


अर्ज शुल्क ( APPLICATION FEES)

▪️अर्ज शुल्क – ₹1000/-

⚠️ सूचना : SBI Collect द्वारे ₹1000/- परीक्षा शुल्क भरल्यानंतर SB Collect Referance नंबर प्राप्त होएल त्यांनंतर ऑनलाइन अर्ज भरावा.

आवश्यक कागदपत्रे (IMPORTANT DOCUMENTS)

✓ जन्मतारखेचा पुरावा (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र)
✓ सर्व शैक्षणिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे
✓ टायपिंग/शॉर्टहँड प्रमाणपत्र
✓ संगणक प्रमाणपत्र
✓ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✓ महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
✓ दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे चारित्र्य प्रमाणपत्र (Form A नमुन्यात)
✓ आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा वाहन परवाना
✓ अनुभव प्रमाणपत्र (वाहनचालक पदासाठी)
✓ ना-हरकत प्रमाणपत्र (शासकीय कर्मचाऱ्यांसाठी)

संपर्क माहिती (CONTACT DETAILS)

▪️अधिकृत वेबसाईट : https://bombayhighcourt.nic.in
▪️संपर्क : रजिस्ट्रार जनरल उच्च न्यायालय, मुंबई
वेबसाईट नियमितपणे तपासत राहा आणि परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र आणि निकाल यासाठी अपडेट्स पहा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

 1] या भरतीमध्ये एकूण किती पदे आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 2332 पदे आहेत, ज्यात क्लर्क (1332), स्टेनोग्राफर हायर ग्रेड (19), स्टेनोग्राफर लोअर ग्रेड (56), वाहनचालक (37) आणि शिपाई/हमाल/फराश (887) पदांचा समावेश आहे.

2] अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज 5 जानेवारी 2026, संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत स्वीकारले जातील.

3] अर्ज कुठे करावा?
उत्तर: अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर करावा. पोस्ट/कुरियर/हाताने दिलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

4] परीक्षा शुल्क किती आहे?
उत्तर: सर्व पदांसाठी परीक्षा शुल्क ₹1000/- आहे, जे SBI Collect द्वारे ऑनलाइन भरावे लागते.

5] वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: खुला प्रवर्ग : 18-38 वर्षे (क्लर्क/शिपाई), 21-38 वर्षे (स्टेनोग्राफर/वाहनचालक) / आरक्षित प्रवर्ग : 5 वर्षांची सवलत (43 वर्षे) / न्यायालयीन/शासकीय कर्मचारी : कमाल वयोमर्यादा लागू नाही.

6] महाराष्ट्राबाहेरचे उमेदवार अर्ज करू शकतात का?
उत्तर: नाही. फक्त महाराष्ट्र राज्याचे अधिवासी उमेदवार अर्ज करू शकतात. अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

7] मी एकापेक्षा जास्त आस्थापनेसाठी अर्ज करू शकतो का?
उत्तर: नाही. तुम्हाला फक्त एकच आस्थापना निवडावी लागेल (मुंबई/नागपूर/औरंगाबाद). एकदा सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाही.

8] प्रवेशपत्र कधी व कसे मिळेल?
उत्तर: प्रवेशपत्र https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल. Registration ID व Date of Birth वापरून तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता. तारीख वेबसाईटवर जाहीर केली जाईल.

9] नियुक्तीनंतर परिविक्षा कालावधी किती आहे?
उत्तर: सर्व उमेदवारांना 2 वर्षांच्या परिविक्षा कालावधीवर नियुक्ती दिली जाईल. या कालावधीत सेवा कधीही संपुष्टात आणली जाऊ शकते.

10] निवड यादी किती काळ वैध राहील?
उत्तर:
निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या तारखेपासून 2 वर्षे वैध राहील. मुख्य न्यायाधीशांनी मुदतवाढ दिल्याशिवाय यादी रद्द होईल.