इंडियन आर्मी SSC (टेक्निकल) भरती 2026 | INDIAN ARMY RECRUITMENT 2026

January 8, 2026 by

भारतीय सेना (Indian Army) देशातील तरुण इंजिनियर्ससाठी एक उत्तम करिअर संधी घेऊन आली आहे. 67व्या शॉर्ट सर्विस कमिशन (टेक्निकल) अंतर्गत पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. हा कोर्स ऑक्टोबर 2026 मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया, बिहार येथे सुरू होणार आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग पदवीधर असाल आणि देशसेवेची इच्छा असेल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.

▪️भरती विभाग – भारतीय सेना (Indian Army)
▪️भरती प्रकार – ही भरती भारत सरकार (GOVERMENT OF INDIA) द्वारे राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 379 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पदाचे तपशील (Post Details)

▪️पुरुष उमेदवारांसाठी (SSC Tech-67 Men)

  • एकूण जागा – 350

▪️महिला उमेदवारांसाठी (SSC Tech-67 Women)

  • एकूण जागा – 29

शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)

उमेदवारांकडे इंजिनिअरिंग शाखांमध्ये B.E./B.Tech पदवी (DEGREE) असणे आवश्यक आहे.

▪️मुख्य शाखा:

  • सिव्हिल इंजिनिअरिंग (75 जागा पुरुष, 07 जागा महिला)
  • कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (60 जागा पुरुष, 04 जागा महिला)
  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (33 जागा पुरुष, 03 जागा महिला)
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (64 जागा पुरुष, 06 जागा महिला)
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग (101 जागा पुरुष, 09 जागा महिला)
  • विविध शाखा (फूड टेक / प्लॅस्टिक टेक व इतर) (17 जागा पुरुष, 0 जागा महिला)

⚠️ महत्वाची सूचना – अंतिम वर्षातील विद्यार्थी ज्यांनीअजून पदवी (डिग्री) परीक्षा उत्तीर्ण केली नाही परंतु अंतिम वर्षात शिकत आहेत, तेही अर्ज करू शकतात. त्यांनी 01 ऑक्टोबर 2026 पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण करणे आणि सर्व सेमिस्टरची मार्कशीट सादर करणे आवश्यक आहे.

शारीरिक मानके (Physical Standards)

मानकेपुरुषमहिला
धाव2.4 किमी धावणे – 10 मिनिटे 30 सेकंद2.4 किमी धावणे – 13 मिनिटे
पुश-अप4015
पुल-अप0602
सिट-अप3025
स्क्वॅट्स30 × 2 सेट
30 × 2 सेट
लंजेस10 × 2 सेट10 × 2 सेट
पोहणेमूलभूत ज्ञान असणे आवश्यकमूलभूत ज्ञान असणे आवश्यक

वेतनश्रेणी (PAY SCALE)

▪️ट्रेनिंगदरम्यान (शिष्यवृत्ती) – ₹56,100 प्रतिमाह

▪️कमिशन नंतर (लेफ्टनंट रँक)

रँकपे लेव्हलवेतन (₹)
लेफ्टनंटLevel-10₹56,100 – ₹1,77,500
कॅप्टनLevel-10B₹61,300 – ₹1,93,900
मेजरLevel-11₹69,400 – ₹2,07,200
लेफ्टनंट कर्नलLevel-12A₹1,21,200 – ₹2,12,400

▪️एकूण CTC – वर्षाला अंदाजे ₹17-18 लाख (मोफत वैद्यकीय सुविधा आणि वर्षातून एकदा मूळगावी प्रवास वगळून)

▪️इतर भत्ते

  • मिलिटरी सर्विस पे – ₹15,500 प्रतिमाह
  • पॅरा रिझर्व्ह भत्ता – ₹2,625 प्रतिमाह
  • तांत्रिक भत्ता (टियर-I) – ₹3,000 प्रतिमाह
  • तांत्रिक भत्ता (टियर-II) – ₹4,500 प्रतिमाह
  • वाहतूक भत्ता – मोठ्या शहरांसाठी ₹7,200 आणि इतर ठिकाणी ₹3,600 प्रतिमाह
  • बाल शिक्षण भत्ता – दोन मुलांसाठी प्रत्येकी ₹2,250 प्रतिमाह
  • वसतिगृह सबसिडी – ₹6,750 प्रतिमाह प्रति मूल

वयोमर्यादा (Age Limit)

  • वयोमार्याद गणण्याचा दिनांक – 01 ऑक्टोबर 2026
  • किमान वय – 20 वर्ष
  • कमाल वय – 27 वर्ष

महत्वाच्या तारखा (Important Dates)

इवेंटपुरुष उमेदवारमहिला उमेदवार
ऑनलाइन अर्ज सुरुवात07 जानेवारी 202606 जानेवारी 2026
ऑनलाइन अर्ज शेवट05 फेब्रुवारी 202604 फेब्रुवारी 2026
शॉर्टलिस्ट प्रकाशनमार्च 2026 पहिला आठवडामार्च 2026 पहिला आठवडा
SSB मुलाखतएप्रिल-जून 2026एप्रिल-जून 2026
प्रशिक्षण सुरुवातऑक्टोबर 2026ऑक्टोबर 2026

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात (पुरुष)येथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात (महिला)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

निवड प्रक्रिया (Selection Process)

स्टेप 1] शॉर्टलिस्टिंग

उमेदवारांना त्यांच्या इंजिनियरिंग पदवीतील संचयित टक्केवारीच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. कट-ऑफ टक्केवारी मार्च 2026 च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल.

स्टेप 2] SSB मुलाखत

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची खालील ठिकाणी मुलाखत घेतली जाईल:

  • प्रयागराज (उत्तर प्रदेश)
  • भोपाळ (मध्य प्रदेश)
  • बेंगळुरु (कर्नाटक)
  • जालंधर (पंजाब)

SSB कालावधी – 5 दिवस, SSB तारखा – एप्रिल-जून 2026

मुलाखतेत दोन टप्प्यांची प्रक्रिया असेल. टप्पा-1 उत्तीर्ण झालेल्या उमेदवार टप्पा-2 साठी पात्र ठरतील.

स्टेप 3] वैद्यकीय तपासणी

SSB मुलाखतेनंतर शिफारस झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. वैद्यकीय तपासणीची वैधता 270 दिवस असेल.

स्टेप 4] अंतिम यादी

SSB मार्क्सच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. वैद्यकीयदृष्ट्या सुयोग्य उमेदवारांना प्रशिक्षणासाठी प्रवेश पत्र जारी केले जाईल.

▪️प्रशिक्षण तपशील (Training Details)

  • प्रशिक्षण केंद्र: ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया, बिहार
  • कालावधी: 49 आठवडे (ऑक्टोबर 2026 ते सप्टेंबर 2027)
  • शैक्षणिक पदवी: प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर “डिफेन्स मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा” प्रदान केला जाईल.

▪️प्रशिक्षणादरम्यान विवाह

प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवारांना विवाह करण्याची परवानगी नाही. अर्जानंतर विवाह केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.

▪️सेवा अटी (Service Terms)

सेवा कालावधी –

  • प्रारंभिक – 10 वर्षे
  • पहिला रिलीज पर्याय – 5 वर्षांनंतर
  • दुसरा रिलीज पर्याय – 10 वर्षांनंतर
  • तिसरा रिलीज पर्याय – 14 वर्षांनंतर
  • स्थायी कमिशन – 10 वर्षांनंतर पात्रतेच्या आधारे

▪️सेवा विस्तार

10 वर्षांच्या सेवेनंतर, अधिकार्‍यांना आणखी 4 वर्षांसाठी सेवा विस्तार मिळू शकतो, जर ते पात्र आणि योग्य असतील.

अर्ज प्रक्रिया ( APPLICATION PROCESS)

  1. वेबसाइट – www.joinindianarmy.nic.in
  2. “Officer Entry Apply/Login” वर क्लिक करा
  3. नोंदणी पूर्ण करा (आधार क्रमांक आणि मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र आवश्यक)
  4. “Apply Online” निवडा
  5. “Technical Graduate Course” साठी अर्ज करा
  6. सर्व तपशील भरा आणि सबमिट करा

▪️आवश्यक कागदपत्रे

SSB मुलाखतीसाठी सोबत घ्यावयाचे:

  • अर्जाची स्व-प्रमाणित प्रिंट
  • मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र आणि मार्कशीट
  • 12वी प्रमाणपत्र आणि मार्कशीट
  • इंजिनिअरिंग पदवी/तात्पुरती पदवी
  • सर्व सेमिस्टरची मार्कशीट
  • CGPA/ग्रेड रूपांतरण प्रमाणपत्र
  • संचयित टक्केवारी प्रमाणपत्र (अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी)

⚠️ महत्वाचे – DigiLocker प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्रांऐवजी स्वीकारली जाणार नाहीत.

संपर्क माहिती (CONTACT DETAILS)

अधिकृत वेबसाइट: www.joinindianarmy.nic.in
प्रश्नांसाठी:
वेबसाइटवरील ‘Feedback/Query’ पर्याय वापरा
लक्षात ठेवा: अर्ज बंद होण्याच्या 3 दिवस आधी सादर केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र. 1] SSC (Tech) म्हणजे काय?
उत्तर: शॉर्ट सर्विस कमिशन (तकनीकी) हा इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा करण्याचा मार्ग आहे. हा 10 वर्षांचा प्रारंभिक कालावधी असलेला कमिशन आहे.

प्र. 2] पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात का?
उत्तर: होय, हा कोर्स पुरुष आणि महिला दोघांसाठीही खुला आहे. महिला: 30 जागा, पुरुष: 350 जागा

प्र. 3] विवाहित उमेदवार अर्ज करू शकतात का?
उत्तर: नाही, केवळ अविवाहित उमेदवार अर्ज करू शकतात.

प्र. 4] अर्ज कसा करावा?
उत्तर: केवळ ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in वर स्वीकारले जातील.

प्र. 5] अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: सामान्य उमेदवार – 01 ऑक्टोबर 2026 रोजी 20 ते 27 वर्षे (जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान), संरक्षण कर्मचार्‍यांच्या विधवा – कमाल 35 वर्षे

प्र. 6] अंतिम वर्षातील विद्यार्थी अर्ज करू शकतात का?
उत्तर: होय, अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात, परंतु त्यांनी: प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर 12 आठवड्यांत पदवीपत्र सादर करणे आवश्यक, 01 ऑक्टोबर 2026 पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक, सर्व सेमिस्टरची मार्कशीट सादर करणे आवश्यक

प्र. 7] अर्ज फी आहे का?
उत्तर: अधिसूचनेत अर्ज फीचा उल्लेख नाही. सामान्यतः सैन्य भर्तीसाठी कोणतीही अर्ज फी नसते.

प्र. 8] एकापेक्षा जास्त अर्ज करता येतात का?
उत्तर: नाही, एकाच उमेदवाराकडून अनेक अर्ज आले तर उमेदवारी रद्द केली जाईल.

प्र. 9] SSB मुलाखत किती दिवसांची असते?
उत्तर: 5 दिवसांची. टप्पा-1 असफल झाल्यास त्याच दिवशी परत पाठवले जाईल.

प्र. 10] SSB मुलाखतेसाठी प्रवास भत्ता मिळेल का?
उत्तर: होय, प्रथमच या प्रकारच्या कमिशनसाठी उपस्थित राहणार्‍यांना AC-3 Tier रेल्वे/बस भाडे मिळेल.