इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) भरती 2026 | INDIAN OIL CORPORATION LIMITED RECRUITMENT

December 23, 2025 by

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने आपल्या रिफायनरी विभागात 394 नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही संधी देशातील विविध राज्यांतील रिफायनरीजमध्ये तरुण आणि ऊर्जावान उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्र, असम, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि ओडिशा येथील उमेदवार या IOCL रिफायनरी भरती 2025 साठी अर्ज करू शकतात. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



▪️भरती विभाग – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)
▪️भरती प्रकार – ही भरती भारत सरकार (GOVERMENT OF INDIA) च्या अंतर्गत असलेलल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्फत राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 394 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र, असम, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि ओडिशा

पदाचे तपशील (Post Details)

पदाचे नावएकूण जागा
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन)232 पदे
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)37 पदे
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)22 पदे
ज्युनियर इंजिनिअरिंग/टेक्निकल असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)12 पदे
ज्युनियर इंजिनिअरिंग/टेक्निकल असिस्टंट-IV (मेकॅनिकल)14 पदे
ज्युनियर इंजिनिअरिंग/टेक्निकल असिस्टंट-IV (इन्स्ट्रुमेंटेशन)6 पदे
ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट20 पदे
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर अँड सेफ्टी)51 पदे
394

शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)

1] ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन)

  • केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नॉलॉजी/पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा
  • B.Sc (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र)
  • सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी किमान 50% गुण आणि SC/ST उमेदवारांसाठी 45% गुण आवश्यक


2] ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)

  • मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा B.Sc
  • विशेष आवश्यकता – बॉयलर कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट (BCC) सेकंड क्लास किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC)


3] ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा
  • किमान 50% गुण (सामान्य/EWS/OBC) आणि 45% (SC/ST)


4] ज्युनियर इंजिनिअरिंग/टेक्निकल असिस्टंट-IV [इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन]

  • संबंधित शाखेतील 3 वर्षांचा डिप्लोमा
  • किमान 50% गुण (सामान्य/EWS/OBC) आणि 45% (SC/ST/PwBD)


5] ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट

  • B.Sc (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र)
  • किमान 50% गुण (सामान्य/EWS/OBC) आणि 45% (SC/ST/PwBD)


6] ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर अँड सेफ्टी)

  • इंटरमीडिएट (10+2) पास
  • NFSC-नागपूर येथून सब-ऑफिसर्स कोर्स
  • वैध हेवी व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स


▪️शारीरिक पात्रता (फायर अँड सेफ्टी) –

  • उंची – किमान 165 सेमी
  • छाती – 81 सेमी (विस्तारित नसताना) आणि 86 सेमी (विस्तारित)
  • वजन – किमान 50 किलो


वेतनश्रेणी (PAY SCALE)

▪️वेतन श्रेणी – ₹25,000 – ₹1,05,000/-
▪️शासकीय नियमानुसार इतर महागाई भत्ते

वयोमर्यादा (Age Limit)

किमान वयकमाल वय
18 वर्षे26 वर्षे

▪️वयोमर्यादा सवलत

SC/ST उमेदवारांसाठी5 वर्षे (कमाल वय 31 वर्षे)
OBC (NCL) उमेदवारांसाठी3 वर्षे (कमाल वय 29 वर्षे)
PwBD उमेदवारांसाठी10 वर्षे (कमाल वय 36 वर्षे)
PwBD SC/ST उमेदवारांसाठी15 वर्षे (कमाल वय 41 वर्षे)
PwBD OBC उमेदवारांसाठी13 वर्षे (कमाल वय 39 वर्षे)
माजी सैनिकांसाठीशासकीय नियमानुसार



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरू होण्याची तारीख20 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख9 जानेवारी 2026
CBT साठी कॉल लेटरपरीक्षेच्या 7 दिवस आधी
संभाव्य CBT तारीखजानेवारी 2026 चा शेवटचा आठवडा
CBT निकालपरीक्षेनंतर दोन आठवड्यांत

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

निवड प्रक्रिया (Selection Process)

IOCL रिफायनरी नोकरी 2025 च्या निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्पे आहेत.

1] कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)

  • एकूण प्रश्न: 100
  • एकूण गुण: 100 (प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण)
  • कालावधी: 120 मिनिटे
  • नकारात्मक गुणांकन: नाही


▪️विभाग

  • विषय ज्ञान: 75 गुण
  • संख्यात्मक क्षमता: 15 गुण
  • सामान्य जागरूकता: 10 गुण


▪️पात्रता गुण

  • सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी – किमान 40%
  • SC/ST/PwBD उमेदवारांसाठी – किमान 35%


▪️परीक्षा भाषा – इंग्रजी आणि हिंदी

2] स्किल/प्रोफिशन्सी/फिजिकल टेस्ट (SPPT)

CBT मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि 1:2 च्या प्रमाणात शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना SPPT साठी बोलावले जाईल. ही पात्रता परीक्षा असेल.

3] अंतिम निवड

CBT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे रिफायनरी-निहाय आणि विषय-निहाय मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

▪️ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

स्टेप 1] नोंदणी

  1. IOCL च्या अधिकृत वेबसाइट www.iocl.com वर जा
  2. “What’s New” सेक्शनमध्ये जा
  3. “Requirement of Non-Executive Personnel in Refineries Division – 2025” लिंक क्लिक करा
  4. “Click here to Apply Online” वर क्लिक करा
  5. नवीन नोंदणीसाठी आवश्यक माहिती भरा
  6. तात्पुरता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवा


स्टेप 2] अर्ज भरणे

  1. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा
  2. अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा
  3. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वैयक्तिक माहिती इ. अचूकपणे भरा


स्टेप 3] दस्तऐवज अपलोड करा

▪️खालील दस्तऐवजांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा:

  • पासपोर्ट साईज फोटो (4.5 cm × 3.5 cm)
  • स्वाक्षरी
  • डाव्या हाताचा अंगठा
  • हस्तलिखित घोषणापत्र
  • दहावीचे प्रमाणपत्र (वयाच्या पुराव्यासाठी)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट)
  • जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS उमेदवारांसाठी)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
  • माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ओळखपत्र (पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र/आधार कार्ड)


स्टेप 4] अर्ज शुल्क भरा

  1. ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून शुल्क भरा
  2. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर ई-रिसीट डाउनलोड करा


स्टेप 5] अर्ज सबमिट करा

  1. सर्व माहिती तपासून पहा
  2. “Submit” बटण क्लिक करा
  3. अर्जाची प्रिंट काढून ठेवा

▪️महत्त्वाच्या सूचना

✓ एक उमेदवार केवळ एका पदासाठी आणि एका रिफायनरीसाठीच अर्ज करू शकतो
✓ उच्च व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार पात्र नाहीत (BE, B.Tech, MBA, CA, CS, CMA, LLB, MCA, Ph.D इ.)
✓ फक्त नियमित पूर्णवेळ अभ्यासक्रम मान्य – पत्रव्यवहार/दूरस्थ शिक्षण मान्य नाही
✓ CGPA/OGPA असल्यास विद्यापीठाचे रूपांतर प्रमाणपत्र आवश्यक
✓ डिप्लोमा लॅटरल एंट्री उमेदवार (XII/ITI नंतर द्वितीय वर्षात प्रवेश) पात्र आहेत
✓ CBT परीक्षेसाठी तीन शहरांची प्राधान्यक्रमानुसार निवड करावी
✓ SC/ST/PwBD उमेदवारांना प्रवास खर्चाची परतफेड (किमान 30 किमी अंतरावर)

▪️परीक्षा केंद्रे

संभाव्य शहरे – विशाखापट्टणम, विजयवाडा, डिब्रूगड, गुवाहाटी, जोरहाट, सिलचर, मुजफ्फरपूर, पाटणा, रायपूर, दिल्ली/NCR, अहमदाबाद, वडोदरा, अंबाला, रांची, बेंगलुरू, भोपाळ, इंदूर, मुंबई, भुवनेश्वर, कटक, मोहाली, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, कानपूर, आग्रा, लखनऊ, प्रयागराज, रुड़की, देहरादून, दुर्गापूर, सिलीगुडी, कोलकाता

अर्ज शुल्क ( APPLICATION FEES)

▪️सामान्य/EWS/OBC (NCL) उमेदवारांसाठी – ₹300/-
▪️शुल्क माफी – SC/ST/PwBD/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही
▪️पेमेंट पद्धत – ऑनलाइन (डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/UPI/मोबाइल वॉलेट)

संपर्क माहिती (CONTACT DETAILS)

▪️वेबसाइट – www.iocl.com
▪️हेल्पलाइन –

  • टोल-फ्री नंबर – 1800222366 किंवा 18001034566
  • ऑनलाइन तक्रार – https://cgrs.ibps.in
  • कार्यवेळ – सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:00 (कामकाजाच्या दिवशी)


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

 1] IOCL रिफायनरी नॉन-एक्झिक्युटिव्ह भरती 2025 मध्ये एकूण किती पदे आहेत?
उत्तर: एकूण 394 पदे भरली जाणार आहेत.

2] या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
उत्तर: अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांनी IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

3] शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: 👉 पदानुसार डिप्लोमा (Engineering) किंवा B.Sc पात्रता आवश्यक आहे.
👉 Fire & Safety पदासाठी NFSC नागपूरचा Sub-Officer Course + Heavy Vehicle License आवश्यक आहे.

4] BE / B.Tech / MBA केलेले उमेदवार अर्ज करू शकतात का?
उत्तर: नाही. उच्च व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार अपात्र आहेत.

5] CBT परीक्षेची भाषा कोणती आहे?
उत्तर: परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये असेल.

6] वेतनश्रेणी (Salary) किती आहे?
उत्तर: सर्व पदांसाठी वेतनश्रेणी: ₹25,000 – ₹1,05,000/- (DA, HRA, Incentives आणि इतर भत्ते वेगळे)

7] महिलांना कोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल?
उत्तर: 👉 महिला उमेदवार Electrical, Mechanical आणि Instrumentation पदांसाठी पात्र आहेत.
👉 Production, P&U आणि Fire & Safety पदांसाठी महिला उमेदवार सध्या पात्र नाहीत.

8] IOCL भरतीबाबत अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: फक्त IOCL ची अधिकृत वेबसाइट (www.iocl.com) आणि Employment News वर दिलेल्या जाहिरातीवरच विश्वास ठेवा.

9] अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General / EWS / OBC (NCL): ₹300/- आणि SC / ST / PwBD / माजी सैनिक: शुल्क माफ

10] एका उमेदवाराला किती पदांसाठी अर्ज करता येईल?
उत्तर:
फक्त एका पदासाठी आणि एका रिफायनरीसाठीच अर्ज करता येईल.