बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या युवकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) मार्फत लिपिक पदांसाठी 10,277 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पदवीधर उमेदवारांसाठी असून, भारतातील विविध नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.

🟥 भरती विभाग : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS).
🟥 भरती प्रकार : केंद्र सरकार च्या वतीने हे भरती राबविण्यात येत आहे.
🟥अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
🟥 एकूण पद : या भरती मध्ये एकूण 10,277 पद आहे.
🟥 वेतनश्रेणी : 19,900/- ते 47,920/-
🟥 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता :
🔹उमेदवाराने भारत सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (ग्रॅज्युएशन) प्राप्त केलेली असावी किंवा समकक्ष पात्रता असावी.नोंदणीच्या दिवशी उमेदवाराकडे पदवीचे मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
🔹संगणक प्रणाली चालवणे व वापरण्याचे ज्ञान आवश्यक आहे. याचा अर्थ उमेदवाराकडे संगणक विषयक सर्टिफिकेट/डिप्लोमा/डिग्री असावी,किंवा उच्च माध्यमिक/कॉलेजमध्ये संगणक अथवा माहिती तंत्रज्ञान (IT) हा विषय शिकलेला असावा.
🔹उमेदवाराला ज्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात अर्ज करत आहेत त्या राज्याची अधिकृत भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
किमान वय | 20 वर्ष |
कमाल वय | 28 वर्ष |
वयोमर्यादा सवलत (Age Relaxation):आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येते:
🔹 SC/ST (अनुसूचित जाती/जमाती): 5 वर्षे सवलत
🔹 OBC (नॉन-क्रीमी लेयर): 3 वर्षे सवलत
🔹 प्रमाणित अपंगत्व असलेले उमेदवार (PwBD): 10 वर्षे सवलत
🔹 माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक: शासनाच्या नियमांनुसार सवलत
🔹 विधवा, घटस्फोटित महिला व कायदेशीररीत्या पतीपासून विभक्त झालेल्या पण पुनर्विवाह न केलेल्या महिला: सामान्य/ईडब्ल्यूएस (General/EWS) प्रवर्गासाठी: 35 वर्षांपर्यंत, ओबीसीसाठी: 38 वर्षांपर्यंत, एससी/एसटीसाठी: 40 वर्षांपर्यंत
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू | 1 ऑगस्ट 2025 |
अर्ज बंद | 21 ऑगस्ट 2025 |
अर्ज फी :
Sc / St / PwBD /ESM | 175 /- |
General / OBC / EWS | 850 /- |

निवड प्रक्रिया :
IBPS लिपिक निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यांत विभागलेली आहे – दोन ऑनलाईन परीक्षा आणि स्थानिक भाषेची चाचणी. या प्रक्रियेमधून सर्वात पात्र उमेदवारांची निवड केली जाते.
टप्पा 1: प्रारंभिक परीक्षाही निवड प्रक्रियेतील पहिली परीक्षा असून, ती केवळ पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. या परीक्षेत मिळालेले गुण अंतिम यादीत धरले जात नाहीत, परंतु मुख्य परीक्षेस पात्र होण्यासाठी प्रत्येक विभागाचा आणि एकूण कट-ऑफ पार करणे आवश्यक असते.
🔹माध्यम: ऑनलाईन
🔹प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔹नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील
टप्पा 2: मुख्य परीक्षाप्रारंभिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षेस बोलावले जाते. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्या आधारावर तात्पुरती नियुक्ती केली जाते.
🔹माध्यम: ऑनलाईन
🔹प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔹नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील
टप्पा 3: स्थानिक भाषा प्राविण्य चाचणीमुख्य परीक्षेनंतर तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांची स्थानिक भाषेतील चाचणी घेतली जाते. ही फक्त पात्रता तपासण्यासाठी असते. ज्यांना ही चाचणी उत्तीर्ण करता येत नाही, त्यांची निवड रद्द केली जाते. मात्र, जर उमेदवाराने 10वी किंवा 12वीमध्ये संबंधित राज्याची स्थानिक भाषा शिकलेली असेल, तर त्यांना ही चाचणी देण्याची गरज नसते.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची प्रक्रिया :
1. अधिकृत IBPS वेबसाइटला भेट द्या (खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा).
2. मुख्यपृष्ठावर “CRP Clerical” या लिंकवर क्लिक करा.
3. “CLICK HERE TO APPLY ONLINE FOR CRP – Customer Service Associates (CRP-CSA-XV)” या पर्यायाची निवड करा.
4. “CLICK HERE FOR NEW REGISTRATION” या लिंकवर क्लिक करून तुमची प्राथमिक माहिती भरा.
5. नोंदणी झाल्यानंतर एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार होईल, जो तुमच्या ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल.
6. नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि तुमची वैयक्तिक, शैक्षणिक व संपर्क माहिती भरून अर्ज पूर्ण करा.
7. दिलेल्या सूचनांनुसार तुमचा फोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित जाहीरनामा स्कॅन करून अपलोड करा.
8. तुम्हाला ज्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे, ती राज्य निवडा.
9. अर्ज सादर करण्यापूर्वी संपूर्ण माहिती नीट तपासून पाहा.
10. पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क ऑनलाईन भरा.
11. पेमेंट यशस्वी झाल्यावर, ई-रसीद आणि अंतिम अर्जाची प्रिंट घ्या व भविष्यासाठी जतन करा.