लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 |लिपीक, शिपाई व वाहन चालक पदांसाठी 375 जागा

December 27, 2025 by

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, लातूर यांनी लिपीक (लेखनिक), शिपाई/सबग्रेड (Multipurpose Support Staff) आणि वाहन चालक या पदांसाठी एकूण 375 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2026 आहे. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



▪️भरती विभाग – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, लातूर
▪️भरती प्रकार – ही भरती महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटी कायदा – 1960 च्या अंतर्गत असलेलल्या संस्था, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, लातूर मार्फत राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 375 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – लातूर, महाराष्ट्र

पदाचे तपशील (Post Details)

▪️लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 अंतर्गत खालील पदांवर भरती करण्यात येणार आहे.

पदाचे नावएकूण जागा
लिपीक (लेखनिक)250
शिपाई/सबग्रेड (Multipurpose Support Staff)115
वाहन चालक10
375

शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)

1] लिपीक (लेखनिक)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी (Graduate) किमान 60% गुणांसह
  • महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे संगणक प्रमाणपत्र
  • (मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक पदवी/पदविका असल्यास ही अट शिथील)

2] शिपाई/सबग्रेड (Multipurpose Support Staff)

  • 12वी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह

3] वाहन चालक पद

  • 12वी उत्तीर्ण किमान 60% गुणांसह
  • मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे वैध हलके मोटार वाहन (LMV) चालविणेचा परवाना
  • स्वच्छ ड्रायव्हिंग रेकॉर्ड
  • शारीरिक दृष्ट्या सदृढ व निर्व्यसनी असावे
  • मराठी/इंग्रजी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक
  • कॅरेक्टर सर्टिफिकेट आवश्यक


वेतनश्रेणी (PAY SCALE)

▪️निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम एक वर्षासाठी परिविक्षाधिन (Probation) सेवेत नेमणूक दिली जाईल. त्यानंतर खालील वेतनश्रेणीत मूळ वेतन, लागू डीए व सेवानियमानुसार भत्ते देण्यात येतील:

पदवेतन श्रेणी (रुपये)
लिपीक (लेखनिक)430-30-560-40-760-50-1010-60-1310-70-1660-80-1900-90-2080
शिपाई/सबग्रेड310-15-385-20-485-25-610-30-760-40-960-50-1210-60-1390-70-1530
वाहन चालक320-15-395-20-495-25-620-30-770-40-970-50-1220-60-1400-70-1540

वयोमर्यादा (Age Limit)

पदवयोमर्यादा
लिपीक (लेखनिक)किमान – 21 वर्षे
कमाल – 30 वर्षे
शिपाई/सबग्रेडकिमान – 19 वर्षे
कमाल – 28 वर्षे
वाहन चालककिमान – 19 वर्षे
कमाल – 28 वर्षे



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरू होण्याची तारीख23 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जानेवारी 2026
परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोडबँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल
ऑनलाईन परीक्षाबँकेच्या संकेतस्थळावर जाहीर होईल

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

निवड प्रक्रिया (Selection Process)

1] लिपीक (लेखनिक) पदासाठी

▪️ ऑनलाईन परीक्षा (90 गुण) –

  • एकूण 90 प्रश्न, प्रत्येक प्रश्नास 1 गुण
  • कालावधी – 90 मिनिटे
  • विषय – शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी भाषा ज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमापन चाचणी
  • माध्यम – इंग्रजी व मराठी


▪️ मुलाखत (10 गुण):

  • शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. – 5 गुण
  • मौखिक Interview – 5 गुण


2] शिपाई/सबग्रेड व वाहन चालक पदासाठी

▪️ ऑनलाईन परीक्षा (90 गुण)

  • एकूण 90 प्रश्न, प्रत्येक प्रश्नास 1 गुण
  • कालावधी – 90 मिनिटे
  • विषय – मराठी व इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान, लातूर जिल्ह्याची माहिती, गणित, बुद्धिमापन चाचणी व बँकिंग/सहकार
  • माध्यम – इंग्रजी व मराठी


▪️मौखिक परीक्षा (10 गुण)

अर्ज प्रक्रिया ( APPLICATION PROCESS)

स्टेप 1] बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html भेट द्या
स्टेप 2] “New Registration” या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करा
स्टेप 3] विस्तृत माहिती (Advertisement) व सूचना (How to Apply) काळजीपूर्वक वाचा
स्टेप 4] ऑनलाईन अर्ज संपूर्ण व अचूक माहितीसह भरा
स्टेप 5] खालील कागदपत्रे JPG/JPEG/PNG/PDF स्वरूपात अपलोड करा:

  • अद्ययावत रंगीत छायाचित्र (स्पष्ट पार्श्वभूमी, दोन्ही कान दिसणारे)
  • स्वाक्षरी (पांढऱ्या कागदावर काळ्या/निळ्या शाईने)
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसेंस (वाहन चालक पदासाठी)
  • अधिवास प्रमाणपत्र (अनिवार्य)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे


स्टेप 6] परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा (₹900)
स्टेप 7] अर्जाची प्रत डाऊनलोड करून ठेवा

▪️महत्वाच्या सूचना

✓ केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील
✓ कोणत्याही प्रकारचे सामाजिक व समांतर आरक्षण लागू नाही
✓ अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही
✓ अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे अनिवार्य
✓ वैध मतदार क्रमांक नमूद करणे आवश्यक
✓ चुकीचा/अपूर्ण ई-मेल किंवा मोबाईल नंबर दिल्यास सर्व जबाबदारी उमेदवाराची
✓ निवड झालेल्या उमेदवारास बँकेकडे किमान 3 वर्षे सेवा करणे बंधनकारक

अर्ज शुल्क ( APPLICATION FEES)

▪️सर्व पदांसाठी परीक्षा शुल्क समान आहे.

  • परीक्षा शुल्क – ₹762
  • GST (18%) – ₹138
  • एकूण शुल्क – ₹900

संपर्क माहिती (CONTACT DETAILS)

▪️हेल्पडेस्क – 022-61087546 (सोमवार ते शनिवार, सकाळी 9:00 ते सायंकाळी 6:00 पर्यंत)
▪️अधिकृत संकेतस्थळ – https://laturdccb.com
▪️ई-मेल – admin@laturdccb.com
▪️मुख्य कार्यालय – टिळक नगर, मेन रोड, लातूर-413512

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

 1] लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 ही सरकारी भरती आहे का?
उत्तर: ही भरती सहकारी बँक अंतर्गत आहे. ही थेट केंद्र/राज्य सरकारी भरती नसली तरी शासकीय नियमांनुसार चालणारी व विश्वासार्ह संस्था आहे.

2] एकूण किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर: एकूण 375 जागा भरल्या जाणार आहेत. [ वाहन चालक – 10, लिपीक (लेखनिक) – 250, शिपाई/सबग्रेड – 115 ]

3] अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: 21 जानेवारी 2026, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

4] ही भरती कोणत्या पद्धतीने केली जाणार आहे?
उत्तर: भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेद्वारे व मुलाखतीद्वारे होईल.

5] वयोमर्यादा किती आहे?
उत्तर:
लिपीक – 21 ते 30 वर्षे, शिपाई / वाहन चालक – 19 ते 28 वर्षे (30 नोव्हेंबर 2025 अखेर)

6] परीक्षा कोणत्या भाषेत होईल?
उत्तर: परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असेल.

7] निवड झाल्यानंतर सेवा कालावधी बंधनकारक आहे का?
उत्तर: होय. निवड झालेल्या उमेदवाराने किमान 3 वर्षे सेवा करणे बंधनकारक आहे.

8] वाहन चालक पदासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे का?
उत्तर: वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे.

9] अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
उत्तर: https://laturdccb.com/

10] अर्जात चूक झाल्यास दुरुस्ती करता येईल का?
उत्तर:
नाही. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.