MPSC Rajyaseva Recruitment 2026 | MPSC नागरी सेवा राजपत्रित भरती 2026 – 87 जागा

January 6, 2026 by

महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2026 साठी एकूण 87 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. MPSC Rajyaseva Recruitment 2026 मध्ये विविध विभागांतर्गत या प्रतिष्ठित पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली Mpsc rajyaseva recruitment 2026 notification (अधिकृत जाहिरात) वाचून ऑनलाइन अर्ज करावा.



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



▪️भरती विभाग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
▪️भरती प्रकार – ही भरती राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) द्वारे राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 87 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पदाचे तपशील (Post Details)

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 87 पदे भरण्यात येणार आहेत:

▪️विभागानुसार पदे –

विभागसंवर्गएकूण पदे
सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब79
महसूल व वन विभागमहाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा08

▪️राज्य सेवा (पदे) –

  • उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ – 13 पदे
  • सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 32 पदे
  • सहायक गट विकास अधिकारी, गट-ब – 30 पदे
  • उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब – 04 पदे


▪️महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा (पदे)

  • पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ- 08 पदे


शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)

▪️राज्य सेवा परीक्षेसाठी

1] सामान्य पदांसाठी –
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता

2] सहायक संचालक (वित्त व लेखा सेवा) साठी –

  • वाणिज्य शाखेची स्नातक पदवी (किमान ५५% गुणांसह), किंवा
  • सनदी लेखापाल अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा
  • परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा
  • वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा
  • वित्त व्यवसाय प्रशासनात MBA


3] उद्योग अधिकारी (तांत्रिक) साठी –

  • अभियांत्रिकी मधील पदवी (BE/B.Tech), किंवा
  • विज्ञान शाखेतील पदवी


▪️महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेसाठी

  • पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मधील पदवी (B.V.Sc.)
  • महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, 1971 अन्वये नोंदणी आवश्यक
  • महत्वाचे: मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वेतनश्रेणी (PAY SCALE)

प्रत्येक संवर्गाच्या वेतनश्रेणी संबंधित सेवाप्रवेश नियमानुसार राहील. गट-अ व गट-ब पदांसाठी महाराष्ट्र शासनाच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन देण्यात येईल.

वयोमर्यादा (Age Limit)

▪️वयोमार्यादा गणण्याचा दिनांक –

  • बहुतेक संवर्गांसाठी – 1 एप्रिल, 2026
  • उद्योग अधिकारी (तांत्रिक) आणि पशुवैद्यकीय अधिकारी साठी – 20 जानेवारी, 2026
किमान वयकमाल वय
18/19 वर्ष38 वर्ष

▪️वयोमर्यादा सवलत –

कॅटेगरीकमाल वय
मागासवर्गीय43 वर्ष
आ.दु.घ.43 वर्ष
अनाथ43 वर्ष
प्राविण्य प्राप्त खेळाडू43 वर्ष
दिव्यांग48 वर्ष
माजी सैनिक48 वर्ष




WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



महत्वाच्या तारखा (Mpsc Rajyaseva Recruitment 2026 Dates)

अर्ज सुरू होण्याची तारीख31 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जानेवारी 2026
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख20 जानेवारी 2026

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

निवड प्रक्रिया (Selection Process)

▪️निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये राबविली जाईल:

1] संयुक्त पूर्व परीक्षा (Preliminary Exam)

  • तारीख – 31 मे, 2026 (रविवार)
  • गुण – 200 गुण
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ प्रश्न (Objective Type)
  • केंद्रे – महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर


2] मुख्य परीक्षा (Main Exam)

  • गुण – राज्य सेवा – 800 गुण, पशुवैद्यकीय सेवा – 400 गुण
  • स्वरूप – वर्णनात्मक (Descriptive)
  • विषय – वैकल्पिक विषय निवड आवश्यक


3] मुलाखत (Interview)

  • गुण – राज्य सेवा – 100 गुण, पशुवैद्यकीय सेवा – 100 गुण
  • मुलाखतीपूर्वी किंवा नंतर वैद्यकीय तपासणी


⚠️ महत्वाचे: पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी मानले जातील. अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या एकत्रित गुणांवर होईल.

अर्ज प्रक्रिया ( APPLICATION PROCESS)

Step 1] खाते तयार करणे

  • आयोगाच्या संकेतस्थळावर https://mpsconline.gov.in भेट द्या
  • नवीन खाते तयार करा किंवा विद्यमान खाते अद्ययावत करा


Step 2] अर्ज भरणे

  • सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा
  • सेवा व संवर्गाचा विकल्प द्या
  • राज्यसेवेसाठी वैकल्पिक विषय निवडा
  • उत्तरे लिहिण्याचे माध्यम (मराठी/इंग्रजी) निवडा


Step 3] कागदपत्रे अपलोड करणे

आवश्यक कागदपत्रे (लागू असल्यास):

  • सामाजिक प्रवर्गाचे प्रमाणपत्र
  • नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (2025-2026)
  • EWS प्रमाणपत्र (2025-2026)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (किमान 40%)
  • खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल
  • अनाथ प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)


Step 4] परीक्षा शुल्क भरणे

  • ऑनलाइन पद्धतीने किंवा SBI चलनाद्वारे
  • पेमेंट यशस्वी झाल्याची खात्री करा


Step 5] जिल्हा केंद्र निवडणे

  • परीक्षा देण्यासाठी जिल्हा केंद्र निवडा
  • एकदा निवडलेले केंद्र बदलता येणार नाही


Step 6] KYC प्रक्रिया पूर्ण करणे

  • आयोगाच्या सूचनांनुसार KYC प्रक्रिया पूर्ण करा


⚠️ महत्वाचे सूचना –

  1. फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील
  2. एक उमेदवार – एक अर्ज या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करा
  3. सर्व माहिती अचूक भरा – चुकीच्या माहितीमुळे अर्ज रद्द होऊ शकतो
  4. प्रवेशप्रमाणपत्र परीक्षेपूर्वी ७ दिवस अगोदर ऑनलाइन उपलब्ध होईल
  5. परीक्षेच्यावेळी मूळ ओळखपत्र (Aadhaar Card/Voter ID/Passport/PAN Card/Driving License) आवश्यक


अर्ज शुल्क ( APPLICATION FEES)

कॅटेगरीशुल्क
अराखीव (खुला)रु. 544/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांगरु. 344/-

⚠️ नोंद –

  • वरील शुल्कावर बँक चार्जेस व देयक वेगळे असतील
  • परीक्षा शुल्क ना-परतावा आहे
  • शुल्क भरण्याच्या पद्धती: ऑनलाइन (Credit/Debit Card, Net Banking) किंवा SBI बँकेत चलनाद्वारे

संपर्क माहिती (CONTACT DETAILS)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग – त्रिशूल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर 34, सेक्टर 11,
सरोवर विहार समोर, बेलापूर सीबीडी,
नवी मुंबई – 400614

दूरध्वनी: 022-69385900
ई-मेल: contact-secretary@mpsc.gov.in
संकेतस्थळ: https://mpsc.gov.in, https://mpsconline.gov.in

Social Media:
Twitter – @mpsc_office
Instagram – @official_mpsc

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र. 1] या भरतीसाठी एकूण किती पदे आहेत?
उत्तर: या भरतीसाठी एकूण 87 पदे आहेत. यापैकी राज्य सेवा गट-अ व गट-ब साठी 76 पदे आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेसाठी 08 पदे आहेत.

प्र. 2] परीक्षेची तारीख कधी आहे?
उत्तर: संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, 31 मे, 2026 रोजी घेण्यात येईल.

प्र. 3] परीक्षा कोठे होणार आहे?
उत्तर: परीक्षा महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

प्र. 4] अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज करण्यासाठी https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

प्र. 5] अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी, 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.

प्र. 6] एकाच उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो का?
उत्तर: नाही. एक उमेदवार – एक अर्ज हे नियम काटेकोरपणे पाळावे. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील.

प्र. 7] परीक्षा शुल्क किती आहे?
उत्तर: 1] अराखीव (खुला) प्रवर्ग: रु. 544/- | 2] मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: रु. 344/- (वरील शुल्कावर बँक चार्जेस व देयक वेगळे असतील)

प्र. 8] राज्य सेवा परीक्षेसाठी किमान शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आवश्यक आहे. विशिष्ट संवर्गासाठी विशेष अर्हता आवश्यक आहे.

प्र. 9] पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी कोणती अर्हता आवश्यक आहे?
उत्तर: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मधील पदवी (B.V.Sc.) आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, 1971 अन्वये नोंदणी

प्र. 10] मराठी भाषा जाणणे आवश्यक आहे का?
उत्तर: होय. सर्व संवर्गांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.