नागपूर महानगरपालिका भरती 2025: 174 पदांच्या सुवर्ण संधी – संपूर्ण माहिती आणि अर्जाची पद्धत

मोठी बातमी: नागपूर महानगरपालिकेत 174 पदांची भरती! नागपूर शहरातील job seekers साठी एक उत्तम संधी आली आहे! नागपूर महानगरपालिकेने गट-क सेवेतील 174 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. हे सर्व पद सरळसेवेने (थेट भरती) भरले जाणार आहेत.

WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा

महत्वाचे दिनांक

क्रमांकतपशीलदिनांक
1Online अर्ज सुरुवात26 ऑगस्ट 2025
2अर्जाची अंतिम तारीख09 सप्टेंबर 2025
3फी भरण्याची शेवटची तारीख09 सप्टेंबर 2025
4प्रवेशपत्र उपलब्धलवकरच जाहीर होईल

⚠️ सावधान: हे सर्व दिनांक बदलू शकतात. नियमित https://nmcnagpur.gov.in वर तपासत रहा!

पदांचा तपशील आणि वेतनश्रेणी

पदनामपदसंख्यावेतनश्रेणी (महिना)
कनिष्ठ लिपिक60₹19,900 – 63,200
कर संग्राहक74₹19,900 – 63,200
स्टेनोग्राफर10₹38,600 – 1,22,800
लेखापाल / रोखपाल10₹35,400 – 1,12,400
ग्रंथालय सहाय्यक8₹19,900 – 63,200
विधी सहाय्यक6₹38,600 – 1,22,800
प्रोग्रॅमर2₹25,500 – 81,100
हार्डवेअर इंजिनियर2₹38,600 – 1,22,800
सिस्टम अनॅलिस्ट1₹38,600 – 1,22,800
डेटा मॅनेजर1₹38,600 – 1,22,800
एकूण:174 पदे

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ लिपिक
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
– मराठी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र ३० शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र ४० शब्द प्रती मिनिट वेग.
– संगणक अर्हतादर्शक शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हता.

कर संग्राहक
– कोणत्याही शाखेचे पदवीधर.
– मराठी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र ३० शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र ४० शब्द प्रती मिनिट.
– संगणक अर्हतादर्शक शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हता.

स्टेनोग्राफर
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
– मराठी व इंग्रजी लघुलेखन ८० शब्द प्रती मिनिट परीक्षा उत्तीर्ण.
– संगणक अर्हतादर्शक शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हता.
– शासकीय / निमशासकीय कार्यालयात स्टेनोग्राफर पदाचा ३ वर्षांचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य.

लेखापाल / रोखपाल
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
– भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकल फंड ऑडिट मॅन्युअल (C.F.M.P) परीक्षा उत्तीर्ण. किंवा L.G.S.D परीक्षा उत्तीर्ण व अनुभवासह.
– शासकीय / निमशासकीय / स्वायत्त संस्थांमध्ये लिपिक (लेखा) पदावर किमान ५ वर्षांचा अनुभव.

ग्रंथालय सहाय्यक
– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C).
– ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स.

विधी सहाय्यक
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
– शासकीय / निमशासकीय / स्वायत्त संस्थांमध्ये न्यायविषयक कामाशी संबंधित पदावर किमान पाच वर्षांचा न्यायालयीन अनुभव.

प्रोग्रामर
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका (Diploma).
– System Analysis / Programming / Software Development मध्ये १ वर्षांचा अनुभव.
– महापालिकेमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत उमेदवारांना प्राधान्य.

हार्डवेअर इंजिनिअर
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE मान्यताप्राप्त पदवी (B.E. Computer) व संगणक देखभाल व दुरुस्तीचा ३ वर्षांचा अनुभव.किंवामान्यताप्राप्त विद्यापीठाची Computer Hardware मधील पदविका व ५ वर्षांचा अनुभव.
– महापालिकेमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत उमेदवारांना प्राधान्य.

सिस्टम अनॅलिस्ट
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE मान्यताप्राप्त पदवी (B.E. Computer).
– System Analysis / Programming / Software Development मध्ये ३ वर्षांचा अनुभव.
– महापालिकेमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत उमेदवारांना प्राधान्य.

डेटा मॅनेजर
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE मान्यताप्राप्त पदवी (B.E. Computer).
– System Analysis / Programming / Software Development मध्ये ३ वर्षांचा अनुभव.
– महापालिकेमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत उमेदवारांना प्राधान्य.

WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा

वयोमर्यादा

श्रेणीकिमान वयजास्तीत जास्त वय
सर्वसाधारण18 वर्षे38 वर्षे
मागासवर्गीय18 वर्षे43 वर्षे
माजी सैनिक18 वर्षे55 वर्षे

वयोमर्यादा गणन्याचा दिनांक: 09 सप्टेंबर 2025

परीक्षेची माहिती

परीक्षा पद्धत
– ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test)
– वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न
– 100 प्रश्न = 200 गुण
– वेळ: 2 तास

परीक्षा विषय

🔹अतांत्रिक पदांसाठी (कनिष्ठ लिपिक, कर संग्राहक इ.):
– मराठी: 25 प्रश्न
– इंग्रजी: 25 प्रश्न
– बौद्धिक चाचणी: 25 प्रश्न
– सामान्य ज्ञान: 25 प्रश्न

🔹तांत्रिक पदांसाठी:
– मराठी: 15 प्रश्न
– इंग्रजी: 15 प्रश्न
– बौद्धिक चाचणी: 15 प्रश्न
– सामान्य ज्ञान: 15 प्रश्न
– तांत्रिक विषय: 40 प्रश्न

परीक्षा फी

श्रेणीफी
सर्वसाधारण₹1,000
मागासवर्गीय / EWS / अनाथ₹900
माजी सैनिकविनामूल्य

महत्त्वाचे: फी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येईल (Credit Card / Debit Card / UPI / Net Banking)

निवड प्रक्रिया

1️⃣ ऑनलाइन अर्ज (26 ऑगस्ट – 09 सप्टेंबर 2025)
2️⃣ प्रवेशपत्र डाउनलोड (जाहीर होईल)
3️⃣ ऑनलाइन परीक्षा (तारीख जाहीर होईल)
4️⃣ निकाल प्रसिद्धी
5️⃣ कागदपत्रे तपासणी
6️⃣ अंतिम निवड

पास मार्क्स
– सर्वसाधारण: 50%
– मागासवर्गीय: 45%

अर्ज करण्याची प्रक्रिया

स्टेप 1: https://nmcnagpur.gov.in वर जा.
स्टेप 2: “New User Registration” वर क्लिक करा.
स्टेप 3: मोबाइल नंबर आणि Email ID सत्यापित करा.
स्टेप 4: Login ID आणि Password मिळवा.
स्टेप 5: अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6: फी भरा.
स्टेप 7: अर्जाची प्रत डाउनलोड करा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

अपलोड करण्यासाठी आवश्यक
– अधिवास प्रमाणपत्र
– शैक्षणिक प्रमाणपत्रे
– जन्म प्रमाणपत्र
– जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
– अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
– संगणक प्रमाणपत्र
– छायाचित्र (JPEG format, 100KB-2MB)

मदतीसाठी संपर्क

Help Desk: 9513252088 (TCS)
NMC Helpline: 9175414880
वेळ: सोमवार ते शुक्रवार, 10:00 ते 18:00
Website: https://nmcnagpur.gov.in

About me

मी NokariXpress.com या वेबसाईटचा संस्थापक असून गेल्या 4–5 वर्षांपासून govt jobs, private jobs, exam results, job alerts, career guidance, आणि educational updates या क्षेत्रात माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट देण्याचे काम करत आहे. माझा उद्देश म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना योग्य आणि वेळेवर updates पुरवणे, जेणेकरून त्यांना त्यांच्या career मध्ये योग्य दिशा मिळू शकेल.