नाशिक महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागासाठी फायरमन आणि चालक-यंत्रचालक/वाहनचालक या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नाशिक फायरमन (अग्निशमन) भरती 2025 मध्ये एकूण 186 पदे भरण्यात येणार आहेत. पात्र असलेले उमेदवार 10 नोव्हेंबर 2025 ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.
▪️भरती विभाग – नाशिक महानगरपालिका [आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभाग].
▪️भरती प्रकार – महाराष्ट्र शासन (राज्य सरकार) च्या वतीने हे भरती राबविण्यात येत आहे.
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 186 रिक्त पदे आहे.
▪️वेतनश्रेणी – ₹19,900-63,200 मासिक वेतन.
▪️नोकरीचे ठिकाण – नाशिक.
Table of Contents
Toggleपदाचे तपशील
▪️नाशिक महानगरपालिकेतर्फे दोन प्रमुख पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
| पदाचे नाव | एकूण पदे |
|---|---|
| चालक-यंत्र चालक/वाहनचालक (अग्निशमन) | 36 |
| फायरमन (अग्निशामक) | 150 |
| 186 |
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| चालक-यंत्र चालक/वाहनचालक (अग्निशमन) | 1] माध्यमिक शाळांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक. 2] राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य. 3] वाहनचालक या पदावर किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. 4] वैध जडवाहन चालविण्यासाठी परवाना असणे आवश्यक. 5] मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे व बोलणे). |
| फायरमन (अग्निशामक) | 1] माध्यमिक शाळांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक. 2] राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. 3] मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे व बोलणे). |
शारीरिक पात्रता
| पदाचे नाव | शारीरिक पात्रता |
|---|---|
| चालक-यंत्र चालक/वाहनचालक (अग्निशमन) | 1] उंची: 165 सें.मी. (महिला उमेदवारांची 157 सें.मी.)क. 2] छाती: साधारण 81 सें.मी. फुगवून 5 सें.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही). 3] वजन: किमान 50 किलोग्रॅम (पुरुष) व किमान 46 किलोग्रॅम (महिला). 4] दृष्टी: चांगली. |
| फायरमन (अग्निशामक) | 1] उंची: 165 सें.मी. (महिला उमेदवारांची 157 सें.मी.). 2] छाती: साधारण 81 सें.मी. फुगवून 5 सें.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही). 3] वजन: किमान 50 किलोग्रॅम (पुरुष) व किमान 46 किलोग्रॅम (महिला). 4] दृष्टी: चांगली. |
वेतनश्रेणी
| पदाचे नाव | वर्ग | वेतनश्रेणी |
|---|---|---|
| चालक-यंत्र चालक/वाहनचालक (अग्निशमन) | गट-क | S-6, ₹19900-₹63200 |
| फायरमन (अग्निशामक) | गट-ड | S-6, ₹19900-₹63200 |
⚠️ या भरती मध्ये 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू राहील.
वयोमर्यादा
▪️वयोमर्यादा गणण्याचा दिनांक: अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास (1 डिसेंबर 2025)
| कॅटेगरी | वयोमर्यादा |
|---|---|
| खुला | 18 ते 28 वर्षे |
| मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ | 18 ते 33 वर्षे |
| प्राविण्य प्राप्त खेळाडू/अनाथ/आ.दु.घ. | 18 ते 33 वर्षे |
| माजी सैनिक/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त | 18 ते 33 वर्षे |
| पदवीधर अंशकालीन उमेदवार | 18 ते 33 वर्षे |
महत्त्वाचे दिनांक
| ऑनलाइन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 10 नोव्हेंबर 2025 |
| ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 1 डिसेंबर 2025 (रात्री 11:55 पर्यंत) |
| ऑनलाइन परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत | 1 डिसेंबर 2025 |
| परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक | परीक्षेपूर्वी 7 दिवस आधी |
महत्वाचे लिंक्स
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्ज करण्याची लिंक | COMING SOON |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
अर्ज शुल्क
▪️या नाशिक महानगरपालिका फायरमन (अग्निशमन) भरती 2025 साठी परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आहे:
| कॅटेगरी | शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹1000 |
| मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग | ₹900 |
| माजी सैनिक | माजी सैनिकांसाठी शुल्क माफ राहील. |
⚠️ फक्त ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरावयाचे आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, मोबाईल वॉलेट याद्वारे शुल्क भरता येईल. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे.
निवड प्रक्रिया
▪️नाशिक महानगरपालिका फायरमन (अग्निशमन) भरती 2025 मध्ये निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
1] लेखी परीक्षा (ऑनलाइन)
– बहुपर्यायी (MCQ) स्वरूप
– मराठी माध्यम
2] मैदानी चाचणी
– उमेदवारांची शारीरिक पात्रता व कार्यक्षमता तपासण्यासाठी 80 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येईल. लेखी परीक्षेतील गुणांसह या चाचणीतील गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
3] कागदपत्रे पडताळणी
– संभाव्य निवडसूची क्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येईल.
4] वैद्यकीय तपासणी
– अंतिम निवड झाल्यावर नियुक्तीपूर्वी उमेदवाराची बिटको रुग्णालय, नाशिक रोड अथवा सिव्हील रुग्णालय, नाशिक येथे वैद्यकीय तपासणी केली जाईल.
परीक्षेचे स्वरूप
| विषय | प्रश्नसंख्या | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| मराठी | 15 | 30 | – |
| सामान्य ज्ञान | 15 | 30 | – |
| बौद्धिक चाचणी | 15 | 30 | – |
| संबंधित विषय | 15 | 30 | |
| 60 | 120 | 90 मिनिटे |
पात्रता गुण:
1] खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 50% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
2] मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
- 1] प्रोफाईल निर्मिती
- नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.nmc.gov.in भेट द्या.
- “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन नोंदणीसाठी आवश्यक माहिती भरा (नाव, संपर्क तपशील, ई-मेल आयडी).
- वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
2] अर्ज सादरीकरण – - प्रोफाईल तयार झाल्यानंतर लॉग इन करा
- व्यक्तिगत माहिती, शैक्षणिक अहर्ता, अनुभव इ. तपशील भरा
- फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा
- फोटो: रुंदी 3.5 सें.मी. x उंची 4.5 सें.मी.
- स्वाक्षरी: काळ्या शाईच्या पेनने
- फाईल आकार: 20-50 KB
3] शुल्क भरणा – - ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा
- पेमेंट गेटवेद्वारे डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा मोबाईल वॉलेट वापरा
- ई-पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवा
4] अंतिम सबमिशन – - सर्व माहिती पडताळून पहा
- अंतिम सबमिशन करा
- अर्जाची प्रिंट काढून ठेवा
आवश्यक कागदपत्रे
▪️कागदपत्रे पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
1] शाळा सोडल्याचा दाखला / जन्मदाखला
2] माध्यमिक शाळांत (10वी) उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र
3] अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रमाचे प्रमाणपत्र
4] वाहन चालक परवाना (चालक पदासाठी)
5] अनुभव प्रमाणपत्र (चालक पदासाठी)
6] जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
7] जात वैधता प्रमाणपत्र (अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी)
8] नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (मागास वर्गासाठी)
9] अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल)
10] आधार कार्ड
11] पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स (ओळखीचा पुरावा)
12] विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा (लागू असल्यास)
निष्कर्ष
नाशिक महानगरपालिका फायरमन (अग्निशमन) भरती 2025 ही उत्तम संधी आहे त्या सर्व उमेदवारांसाठी जे अग्निशमन सेवेत करिअर करू इच्छितात. 186 पदांसाठी ही भरती महत्त्वाकांक्षी उमेदवारांना स्थिर सरकारी नोकरी आणि चांगल्या वेतनश्रेणीची संधी देते. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्तींचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि आवश्यक पात्रता पूर्ण करत असल्याची खात्री करा.
तुमचा अर्ज आजच करा! अंतिम तारीख 1 डिसेंबर 2025 आहे. उशीर करू नका! अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.nmc.gov.in भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1] नाशिक महानगरपालिका फायरमन भरती 2025 मध्ये एकूण किती पदे आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 186 पदे आहेत. चालक-यांत्र चालक/वाहनचालक (अग्निशमन)- 36 पदे, फायरमन (अग्निशामक)- 150 पदे.
2] या पदांसाठी वेतनश्रेणी काय आहे?
उत्तर: दोन्ही पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार S-6, रु. 19,900 – 63,200 वेतनश्रेणी आहे.
3] अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होऊन 1 डिसेंबर 2025 रात्री 11:55 पर्यंत स्वीकारले जातील.
4] अर्ज कसा करावा?
उत्तर: फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. www.nmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
5] एकाच उमेदवाराने दोन्ही पदांसाठी अर्ज करता येईल का?
उत्तर: होय, परंतु प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल आणि प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल.
6] अंतिम निवड कशा आधारे होईल?
उत्तर: लेखी परीक्षा (120 गुण) + मैदानी चाचणी (80 गुण) = एकूण 200 गुण. गुणवत्तेच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
7] फायरमन पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: माध्यमिक शाळांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
8] अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: खुल्या प्रवर्गासाठी ₹1000, मागास वर्गासाठी ₹900 आणि माजी सैनिकाणा शुल्क नाही आहे.
9] वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: खुला: 18–8 वर्षे / मागास: 18–33 वर्षे.
10] भरतीसंबंधी अधिक माहिती कशी मिळवावी?
उत्तर: भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी नाशिक महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.nmc.gov.in भेट द्यावी.