नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 | 132 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू | NMMC RECRUITMENT 2026

January 2, 2026 by

नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) 2026 साठी एकूण 132 पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीत गट-अ, गट-ब आणि गट-क मधील विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा आणि प्रशासकीय क्षेत्रातील या नोकऱ्यांसाठी पात्र उमेदवार 5 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 दरम्यान अर्ज करू शकतात. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



▪️भरती विभाग – नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
▪️भरती प्रकार – ही भरती राज्य सरकार (महराष्ट्र शासन) मार्फत राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 132 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई

पदाचे तपशील (Post Details)

▪️गट-अ मधील पदे (113 पदे)

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 अंतर्गत गट-अ मध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेतील खालील पदे उपलब्ध आहेत:

पदनामपदसंख्या
वैद्यकशास्त्र तज्ञ16
शल्य चिकित्सक10
स्त्रीरोग तज्ञ21
बालरोग तज्ञ17
क्ष-किरण तज्ञ11
विकृती शास्त्र तज्ञ02
इंटेन्सिव्हिस्ट04
बधिरीकरण तज्ञ05
अस्थीव्यंग तज्ञ04
त्वचारोग तज्ञ01
रक्त संक्रमण अधिकारी01
मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी01
वैद्यकीय अधिकारी (उरोरोग व क्षयरोग)02
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी17
पशुवैद्यकीय अधिकारी01

▪️गट-ब मधील पदे (07 पदे)

प्रशासकीय सेवेतील खालील पदे उपलब्ध आहेत:

पदनामपदसंख्या
सहाय्यक आयुक्त05
महापालिका उपसचिव01
सहाय्यक विधि अधिकारी01

▪️गट-क मधील पदे (12 पदे)

नवी मुंबई महानगरपालिकेत गट-क अंतर्गत खालील पदे उपलब्ध आहेत:

पदनामपदसंख्या
कनिष्ठ अभियंता (विद्युत)08
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)04

शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)

▪️गट-अ पदांसाठी

1] वैद्यकीय पदांसाठी

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील एम.डी./एम.एस. पदव्युत्तर पदवी
  • पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध नसल्यास, संबंधित पदविकाधारक (डिप्लोमा) मधून भरती
  • काही पदांसाठी 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतर्गत नोंदणी आवश्यक
  • मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य


2] कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी:

  • एम.बी.बी.एस. पदवी
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतर्गत नोंदणी
  • मराठी भाषेचे ज्ञान


3] पशुवैद्यकीय अधिकारी:

  • पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी
  • 2 वर्षांचा अनुभव
  • महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय कौन्सिल नोंदणी


▪️गट-ब पदांसाठी

1] सहाय्यक आयुक्त:

  • कोणत्याही शाखेची पदवी
  • मराठी भाषेचे ज्ञान

2] महापालिका उपसचिव:

  • विधि शाखेची पदवी
  • 3 वर्षांचा प्रशासकीय अनुभव
  • मराठी भाषेचे ज्ञान

3] सहाय्यक विधि अधिकारी:

  • मराठी भाषेचे ज्ञान
  • विधि शाखेची पदवी
  • 3 वर्षांचा अधिवक्ता/वकील किंवा संबंधित कामाचा अनुभव


▪️गट-क पदांसाठी

कनिष्ठ अभियंता (विद्युत):

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी):

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक


वेतनश्रेणी (PAY SCALE)

वेतनश्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार असणार:

▪️गट अ पदे

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी वगळता सर्व पदांसाठी वेतनश्रेणीS – 20 [₹56,100 – ₹1,77,500]
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारीS -16 [₹44,900 – ₹1,42,400]

▪️गट ब पदे

सहाय्यक आयुक्तS – 16 [₹44,900 – ₹1,42,400]
महापालिका उपसचिव व
सहाय्यक विधि अधिकारी
S – 15 [₹41,800 – ₹1,32,300]

▪️गट क पदे

कनिष्ठ अभियंता (विद्युत)S-14 [₹38,600 – ₹1,22,800]
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)S-14 [₹38,600 – ₹1,22,800]

वयोमर्यादा (Age Limit)

▪️वयोमर्यादा गणण्याचा दिनांक – 01-12-2025

किमान वयकमाल वय
18 वर्षे38 वर्षे

▪️वयोमर्यादा सवलत

कॅटेगरीवयोमर्यादा सवलत
मागासवर्गीय / अनाथ43 वर्षे
दिव्यांग व्यक्ती [PWD]45 वर्षे
माजी सैनिकसेवा कालावधी + 3 वर्षे
प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त45 वर्षे
अंशकालीन (पदवीधर/पदविकाधारक)कमाल 55 वर्षे
PwBD (SC/ST)15 वर्षे
माजी सैनिक (Ex-Servicemen)3-8 वर्षे (श्रेणीनुसार)



WhatsApp WhatsApp Group
Join करा
Telegram Telegram Group
Join करा
Instagram Instagram
Follow करा



महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरू होण्याची तारीख20 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 फेब्रुवारी 2026

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
सुचनापत्रयेथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात – गट अयेथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात – गट ब येथे क्लिक करा
अधिकृत PDF जाहिरात – गट येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

निवड प्रक्रिया (Selection Process)

नवी मुंबई महानगरपालिका नोकरी 2025 साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:

1] ऑनलाइन परीक्षा

  • बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल
  • परीक्षेचा कालावधी – 2 तास (120 मिनिटे)
  • परीक्षेत पदाची कर्तव्ये, संबंधित विषय, सामान्य ज्ञान इत्यादींचा समावेश असेल
  • दिव्यांग उमेदवारांसाठी प्रति तास 20 मिनिटे अतिरिक्त वेळ


2] कागदपत्रे पडताळणी

  • परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना 1:3 या प्रमाणात कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येईल
  • सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि साक्षांकित प्रती सादर कराव्या लागतील


3] अंतिम निवड

  • ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे अंतिम निवडयादी तयार केली जाईल
  • निवडसूची 2 वर्षांसाठी वैध राहील


⚠️लक्षात घ्या – मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.


अर्ज प्रक्रिया ( APPLICATION PROCESS)

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

STEP 1] नोंदणी करा

  1. अधिकृत वेबसाइट www.nmmc.gov.in वर जा
  2. “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा
  3. नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा
  4. वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा
  5. Login ID आणि Password प्राप्त करा


STEP 2] प्रोफाइल तयार करा

  1. Login करून वैयक्तिक माहिती भरा
  2. शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचा तपशील द्या
  3. निर्धारित आकारातील फोटो अपलोड करा (3.5 cm × 4.5 cm)
  4. स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा


STEP 3] अर्ज भरा

  1. इच्छित पदाची निवड करा
  2. सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  4. Preview पाहून तपासा


STEP 4] परीक्षा शुल्क भरा

  1. Payment टॅबवर क्लिक करा
  2. ऑनलाइन पेमेंट (डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI) द्वारे शुल्क भरा
  3. ई-पावती जतन करा


STEP 5] अर्ज सबमिट करा

  1. सर्व माहिती तपासून “Submit” वर क्लिक करा
  2. अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि जतन करा


▪️महत्वाचे सूचना :

  • अर्ज शेवटच्या तारखेनंतर स्वीकारला जाणार नाही
  • अर्ज फक्त इंग्रजीमध्ये भरावा
  • एकदा सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाहीत

अर्ज शुल्क ( APPLICATION FEES)

कॅटेगरीशुल्क
खुला प्रवर्ग₹1,000/-
मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आर्थिक दुर्बल घटक₹900/-

⚠️ महत्वाचे: परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावे. हे शुल्क परत करण्यात येणार नाही (Non-Refundable).

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

कागदपत्रे पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:

1] सर्वांसाठी अनिवार्य:

  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्मदाखला (वयाचा पुरावा)
  • एस.एस.सी./एच.एस.सी. मार्कशीट आणि प्रमाणपत्र
  • पदवी/पदव्युत्तर पदवी मार्कशीट आणि प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र (15 वर्षांचे)
  • MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र
  • मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • स्वयंघोषणा पत्र


2] वैद्यकीय पदांसाठी अतिरिक्त:

  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (जेथे आवश्यक)


3] आरक्षणासाठी:

  • जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्यांगत्व प्रमाणपत्र (40% किंवा अधिक)
  • माजी सैनिक प्रमाणपत्र
  • खेळाडूचे प्राविण्य प्रमाणपत्र (विभागीय क्रीडा उपसंचालक प्रमाणित)
  • अनाथ प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (2025-26 साठी वैध)


4] विवाहित महिलांसाठी:

  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र (नाव बदलल्यास)


⚠️ सूचना – सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि दोन स्वसाक्षांकित प्रती आणणे आवश्यक आहे.

संपर्क माहिती (CONTACT DETAILS)

कार्यालय पत्ता: नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नं. 1, किल्ले गांवठाण जवळ पामबीच जंक्शन, सेक्टर 15A सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई – 400614
दूरध्वनी – 022-27567070/71/72/81
हेल्पलाइन – 022-27567189
ई-मेल – dmc_admin@nmmc.gov.in / commissioner@nmmc.gov.in
अधिकृत वेबसाइट – www.nmmc.gov.in
कार्यालयीन वेळ – सोमवार ते शुक्रवार (सुट्टी वगळता)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र. 1] नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 मध्ये एकूण किती पदे आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 120 पदे आहेत. यामध्ये गट-अ मधील 113 पदे (वैद्यकीय क्षेत्रातील) आणि गट-ब मधील 7 पदे (प्रशासकीय क्षेत्रातील) समाविष्ट आहेत.

प्र. 2] ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026, रात्री 11:55 वाजेपर्यंत आहे.

प्र. 3] अर्ज कुठे आणि कसा करावा?
उत्तर: अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने www.nmmc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर करावा. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

प्र. 4] एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?
उत्तर: होय, तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकता. परंतु प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज भरून स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल.

प्र. 5] अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात बदल करता येईल का?
उत्तर: नाही, एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. म्हणून अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करण्यापूर्वी तपासून घ्या.

प्र. 6] वैद्यकीय पदांसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
उत्तर: वैद्यकीय पदांसाठी संबंधित विषयातील एम.डी./एम.एस. पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवीधारक उपलब्ध नसल्यास संबंधित डिप्लोमाधारकांना मान्यता आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतर्गत नोंदणी अनिवार्य आहे.

प्र. 7] मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे का?
उत्तर: होय, सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान (लिहिता, वाचता आणि बोलता येणे) अनिवार्य आहे.

प्र. 8] MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक आहे का?
उत्तर: होय, सर्व पदांसाठी MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.

प्र. 9] परीक्षा शुल्क किती आहे?
उत्तर: खुला प्रवर्ग: ₹1,000/- | मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आर्थिक दुर्बल घटक: ₹900/-

प्र. 10] परीक्षा शुल्क परत मिळेल का?
उत्तर: नाही, परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही (Non-Refundable). भरती रद्द झाली तरीही शुल्क परत होणार नाही.