पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे (मल्टीस्टेट बँक) यांनी लेखनिक पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीची संधी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. या लेखनिक भरती 2025 मध्ये इच्छुक उमेदवार 17 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेली अधिकृत जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.
▪️भरती विभाग – पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे (मल्टीस्टेट बँक)
▪️भरती प्रकार – ही भरती स्वायत्त सहकारी संस्था अंतर्गत येणाऱ्या पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे मार्फत राबविण्यात येत आहे
▪️अर्ज पद्धत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
▪️एकूण पद – या भरती मध्ये एकूण 80 रिक्त पदे आहे
▪️नोकरीचे ठिकाण – पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेडच्या सर्व शाखांमध्ये
Table of Contents
Toggleपदाचे तपशील (Post Details)
पदाचे नाव – लेखनिक (Clerk)
पदांची संख्या – 80 जागा
शैक्षणिक पात्रता (EDUCATION QUALIFICATION)
पुणे पीपल्स को-ऑप बँक लेखनिक भरती 2025 साठी खालील शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation)
- एम.एस.सी.आय.टी. (MS-CIT) किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र
- संगणकाचे कोणतेही डिप्लोमा
▪️भाषा ज्ञान – मराठी / हिन्दी / इंग्रजी
▪️प्राधान्य (Preference)
1] बँका किंवा इतर वित्तीय संस्थामधील कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना
2] JAIIB / CAIIB / GDC & A किंवा शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग, सहकार किंवा कायदेविषयक पदविका/पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना
वेतनश्रेणी (PAY SCALE)
पुणे पीपल्स को-ऑप बँक लेखनिक नोकरी 2025 मध्ये वेतन संरचना तीन टप्प्यांमध्ये विभागली गेली आहे:
▪️प्रशिक्षण कालावधी – (2 वर्षे)
प्रथम वर्ष – प्रशिक्षण भत्ता – ₹15,000/- + पी.एफ.
द्वितीय वर्ष – प्रशिक्षण भत्ता – ₹18,000/- + पी.एफ.
▪️प्रोबेशन कालावधी (1 वर्ष)
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाचा प्रोबेशन कालावधी असेल.
वेतन – ₹20,000/- + पी.एफ.
▪️कायम सेवा – प्रोबेशन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सेवेत कायम केले जाईल आणि बँकेच्या वेतनश्रेणीनुसार इतर भत्त्यांसह वेतन देण्यात येईल.
वयोमर्यादा (Age Limit)
▪️वयोमार्यादा गणण्याचा दिनांक – 01/01/2026
| किमान वय | कमाल वय |
| 20 वर्ष | 28 वर्ष |
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 2 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 जानेवारी 2026 |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
| अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया (Selection Process)
पुणे पीपल्स को-ऑप बँक लेखनिक नोकरी 2025 साठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होईल:
1] लेखी परीक्षा (Written Exam – Online)
- परीक्षा पुणे येथे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल
- परीक्षा 100 गुणांची असेल
- बहुपर्यायी (Multiple Choice Questions) स्वरूपाची असेल
- परीक्षा IIBF धर्तीवर घेण्यात येईल
- परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण आणि प्रवेशपत्र उमेदवाराच्या ई-मेल आयडीवर पाठविले जाईल
▪️परीक्षेचे विषय आणि विभाग:
- बँकिंग आणि सहकारी बँकिंग (Banking & Cooperative Banking)
- मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान (Knowledge of Marathi & English Language)
- सामान्य ज्ञान आणि जागरूकता (General Knowledge & Awareness)
- गणित आणि तार्किक विवेचन (Mathematics & Logical Reasoning)
2] तोंडी मुलाखत (Personal Interview)
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी (कट ऑफ) तयार करण्यात येईल
- गुणानुक्रमे उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल
- ऑनलाईन परीक्षा आणि तोंडी परीक्षेतील पात्र उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल
- मुलाखतीत योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल
⚠️लक्षात घ्या: निवड प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार माननीय संचालक मंडळाकडे राहतील.
अर्ज प्रक्रिया ( APPLICATION PROCESS)
▪️पुणे पीपल्स को-ऑप बँक लेखनिक नोकरी 2025 साठी अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:
- अधिकृत वेबसाईट www.kopbankasso.co.in वर भेट द्या
- “Recruitment” किंवा “Career” विभागात जा
- लेखनिक पदासाठीची जाहिरात शोधा
- “Apply Online” लिंकवर क्लिक करा
- आवश्यक माहिती अचूकपणे भरा (विशेषतः ई-मेल आयडी अचूक लिहा)
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ₹1,416/- अर्ज शुल्क ऑनलाईन भरा
- अर्ज सबमिट करा आणि प्रिंट आऊट घ्या
अर्ज शुल्क ( APPLICATION FEES)
- ₹1,200/- + 18% GST = ₹1,416/-
- शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल
- शुल्क परत करण्यात येणार नाही (Non-Refundable)
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
- MSCIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र
- संगणक डिप्लोमा
- जन्म दिनांक पुरावा
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- अधिवास प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी
संपर्क माहिती (CONTACT DETAILS)
▪️कोणत्याही प्रश्नासाठी किंवा अद्यतन माहितीसाठी:
फोन नंबर – 0231-2627307
वेबसाइट – www.kopbankasso.co.in
संपर्क वेळ – सकाळी 10:00 ते संध्याकाळ 5:00
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्र. 1] पुणे पीपल्स को-ऑप बँकेत किती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: पुणे पीपल्स को-ऑप बँकेत 80 पदे आहेत.
प्र. 2] लेखनिक पदासाठी नोकरीचे ठिकाण कोठे आहे?
उत्तर: नोकरीचे ठिकाण पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेडच्या सर्व शाखांमध्ये असेल. निवड झाल्यानंतर तुम्हाला बँकेच्या कोणत्याही शाखेत नियुक्ती मिळू शकते.
प्र. 3] या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2026 आहे.
प्र. 4] या नोकरीसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation)
प्र. 5] MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र म्हणजे नेमके काय?
उत्तर: MSCIT (Maharashtra State Certificate in Information Technology) किंवा त्याच्या समतुल्य कोणतेही संगणक प्रमाणपत्र मान्य आहे, जसे की CCC, DCA, PGDCA इत्यादी.
प्र. 6] वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: दिनांक 01/01/2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
प्र. 7] कोणत्या भाषांचे ज्ञान आवश्यक आहे?
उत्तर: मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचे ज्ञान आवश्यक आहे.
प्र. 8] MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक आहे का?
उत्तर: होय, सर्व पदांसाठी MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
प्र. 9] प्रोबेशन कालावधीत किती वेतन मिळेल?
उत्तर: प्रोबेशन कालावधी (1 वर्ष) मध्ये ₹20,000/- + PF वेतन मिळेल.
प्र. 10] एकूण किती वर्षे प्रशिक्षण आणि प्रोबेशन आहे?
उत्तर: एकूण 3 वर्षे – 2 वर्षे प्रशिक्षण + 1 वर्ष प्रोबेशन.
